Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक; लोकल ट्रेनच्या वेळेत मोठे बदल

Mumbai Local Power Block News : या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. तसेच लांबच्या पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असणार आहेत.
Mumbai Local News
Mumbai Local NewsSaam TV

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शेटच्या लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आलीये. मध्य रेल्वेकडून १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकातून १२.१४ वाजता रात्री शेवटची लोकल सुटेल.

Mumbai Local News
Mega Block News: मुंबईकरांसाठी मोठी अपडेट! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

शेवटची १२.१४ ची लोकल कसाराकडे जाणारी आहे. तर कर्जत आणि ठाणे या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्यात. पॉवर ब्लॉकमुळे कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

किती वेळ असणार पॉवर ब्लॉक

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत फलाटाच्या विस्ताराचे काम चालणार आहे. या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. तसेच लांबच्या पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असणार आहेत.

मेल- एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

१२८७० हावडा-सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस

१२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस

२२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

११०५८ अमृतसर- सीएसएमटी एक्स्प्रेस

११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस

१२८१० हावडा- सीएसएमटी मेलसाठी दादर स्थानकावर शेवटचा थांबा असणार आहे.

मुख्य मार्गातील बदल

ब्लॉक आधी

शुक्रवार-शनिवार-रविवारी मुख्य मार्गावर ब्लॉकपूर्वी सुटणाऱ्या ट्रेनच्या वेळेत देखील बदल झालेत. सीएसएमटीवरून डाऊन धीम्या मार्गावरील शेवटची लोकल कसाऱ्यासाठी १२.१४ वाजता सुटेल. तर सीएसएमटीला जाण्यासाठी कल्याण येथून रात्री १०:३४ वाजता शेवटची लोकल सुटेल.

ब्लॉकनंतर

ब्लॉकनंतर ४:४७ वाजता पहिली लोकल सीएसएमटी येथून कर्जतसाठी सुटेल. तसेच पहाटे ४ वाजता ठाणे येथून सीएसएमटीला जाणारी लोकल सुटेल.

हार्बर मार्गावरील बदल

ब्लॉकपूर्वी

हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी रात्री १२:१३ वाजता शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलकरिता सुटेल. तर पनवेल येथून रात्री १०:४६ वाजता शेवटची लोकल सुटेल.

ब्लॉकनंतर

ब्लॉकनंतर हार्बर मार्गावर पहिली लोकल ४:५२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.

Mumbai Local News
Mumbai Mega Block: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कुठे, कधी, कसा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com