पनवेल : स्वारगेटला निघालेल्या एसटी बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

Navi Mumbai Latest Marathi News : एसटी बसचा अपघात झाल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली.
msrtc bus met with accident 20 passengers injured near panvel
msrtc bus met with accident 20 passengers injured near panvel Saam Digital

- सिद्धेश म्हात्रे

Panvel Accident News :

पनवेल मधील खांदा कॉलनी जवळ प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

प्राथमिक माहितीनूसार एसटी बस जव्हार वरून स्वारगेटला निघाली होती. बस खांदा कॉलनी जवळ आली असता एका वाहनाला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

msrtc bus met with accident 20 passengers injured near panvel
Gadchiroli–Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 165 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, 85,100 वर्ष वयाच्या आजींही मतदानात आघाडीवर

पामबीच मार्गावर भीषण अपघात

नवी मुंबईतील पामबीच मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बेलापुर वरून वाशीच्या दिशेने जाताना सानपाडा जवळ कार वरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून झाडाला धडकली. या कार मधील वाहन चालक जखमी झाला आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कार चालकाचे नाव अखिल पिल्लाई असे आहे. अधिक तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

msrtc bus met with accident 20 passengers injured near panvel
कोकणच्या मुंगेरीलालचा पराभव अटळ, माेठ्या सुट्टीवर जाणार; राणेंचा राऊतांवर प्रहार, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com