Low water levels in Mumbai reservoirs trigger 10% supply cut from May 15 amid delayed monsoon fears. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut : ७ मोठी धरणं तरीही मुंबईवर पाणीसंकट! १५ मेपासून १० टक्के कपात, सध्या किती आहे पाणीसाठा

Mumbai Water Cut From May 15 Full Details: मुंबईतील सात धरणांमधील पाणीसाठा केवळ 28 टक्क्यांवर आला असून 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू होणार आहे.

Omkar Sonawane

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मुंबई शहरात येत्या 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

का घेतला हा निर्णय?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ 28 टक्के साठा शिल्लक आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा किंवा कमी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर ही कपात लागू केली नाही, तर सध्याचा साठा केवळ 6 जुलै पर्यंतच पुरेल. मात्र, 10 टक्के कपात केल्यास हा साठा 17 ऑगस्ट पर्यंत पुरवता येईल, असा पालिकेचा अंदाज आहे.

तलावांमधील सध्या पाण्याची स्थिति

एकूण साठवण क्षमता: 14,47,363 दशलक्ष लिटर(ML)

सध्याचा साठा: साधारण 28. 79 टक्के

दैनंदिन पुरवठा: 3,950 ते 4100 दशलक्ष

अतिरिक्त पाण्याची मागणी

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे साकडे घातले आहे. वैतरणा आणि भातसा धरणातील राखीव साठयातून अतिरिक्त 237 दशलक्ष घनमीटर पाणी मिळावे, अशी मागणी पालिकेने केली आहे.

महापालिका प्रशासनाचे आवाहन

महानगरपालिकेचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, जर या पावसाळ्यात तलाव पूर्ण भरले नाहीत, तर पुढील वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. हवामान खात्याने यंदा नैऋत्य मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता जितका पाणीसाठा आहे तितका 17 ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी 10 टक्के पाणीकपात अनिवार्य आहे.

मुंबईकरांनी काय काळजी घ्यावी?

पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी किंवा घराबाहेर रस्ते धुण्यासाठी वापरू नये. कपातीमुळे पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता असल्याने सहकार्य करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Aadhaar Card Update : आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही!

Wednesday Horoscope: कोर्ट कचेरीच्या कामातून होणार सुटका, अचानक धनलाभाचा योग; जाणून घ्या तुमचं भविष्य

Skin care: रोजच्या कामामुळे स्किन केअरसाठी वेळ मिळत नाही? 5 मिनिटांत करा हे काम चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT