Water Shortage : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, 'या' भागांतील पुरवठा २४ तास राहणार बंद

Pune Water Supply Cut News : पुण्यात १५ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून देखभाल दुरुस्ती कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून काळजी घेण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Water Shortage : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, 'या' भागांतील पुरवठा २४ तास राहणार बंद
Pune Water Crisis 15th April To 16th AprilSaam Tv
Published On
Summary
  • ऐन उन्हाळ्यात संपूर्ण पुण्यात १५ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद

  • देखभाल दुरुस्तीमुळे निर्णय

  • शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

  • नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

सचिन जाधव, पुणे

Pune Water Crisis 15th April To 16th April पुणेकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचं संकट ओढवलं आहे. संपूर्ण पुण्यात येत्या १६ एप्रिल रोजी गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. १५ एप्रिल, बुधवार रात्री १२:०० वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. विद्युत,पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएमपीने विद्युत,पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात संपूर्ण पुण्यात १५ एप्रिल, बुधवार रात्री १२:०० वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Water Shortage : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, 'या' भागांतील पुरवठा २४ तास राहणार बंद
Mumbai : केअर टेकरचं अमानवी कृत्य, २ कुत्र्यांवर अत्याचार; मुंबईतील धक्कदायक प्रकार

आधीच उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांनी केली आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक तेवढा पाणी साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Water Shortage : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, 'या' भागांतील पुरवठा २४ तास राहणार बंद
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

'या' भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार

नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टैंकर पॉईट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीवगांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर टाकी परिसर, चतुश्रुगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल (पर्वती रॉ वॉटर), खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग या परिसरात पाणी बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com