अंधेरीत केअरटेकरकडून कुत्र्यांवर अत्याचार
सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण उघड
आरोपीला अटक, गुन्हा दाखल
परिसरात संतापाचे वातावरण
Mumbai Andheri Dog Rape Case काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव परिसरात एका व्यक्तीने कुत्र्यावर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच, मुंबईच्या अंधेरी परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवलं जात, मात्र दुसरीकडे एका केअर टेकरने २ कुत्र्यांवर अत्याचार केल्याची डोक्यात तिडीक जाणारी घटना घडली आहे. दोन पाळीव कुत्र्यांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आंबोली पोलिसांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील आंबोली भागात राहणाऱ्या एका महिलेकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी त्यांनी एक माणूस ठेवला होता. तो व्यक्ती सुट्टीवर गेल्यामुळे त्यांनी रंजन शाह नावाच्या ३१ वर्षीय व्यक्तीला काही दिवसांसाठी बदलीवर ठेवला होता. ७ एप्रिल रोजी संबंधित महिला वैयक्तिक कामासाठी नवी दिल्लीला गेली असता, त्यांनी कुत्र्यांची जबाबदारी रंजन शाहवर सोपवली. मात्र, घराबाहेर असूनही त्यांचं कुत्र्यांवर आणि घरावर बारकाईने लक्ष होत.
मालकीण बाहेरगावी गेल्याची संधी साधून केअर टेकरने मध्यरात्री कुत्र्यांवर अत्याचार केले. घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्याने महिलेने ते तपासले असता तिला काहीतरी चुकीचं घडतं असल्याचा संशय आला. तिने शेजारी फोन करून तपासण्यास सांगितले. शेजारी राहणारे काही जण महिलेच्या घरी गेले असता, केअर टेकरने कुत्र्यांसोबत खेळत असल्याचे सांगितले. मात्र शेजाऱ्यांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडून सत्य बोलून घेतले.
आरोपीने सांगितले की त्याने, छोट्या कुत्र्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, आणि मोठ्या कुत्र्यावर अत्याचार केले. याप्रकरणी रंजन शाहला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी रंजन शाहवर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या अमानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.