आंध्र प्रदेशात अल्पवयीन मुलीची हत्या
एकतर्फी प्रेमातून घडलेला भयंकर गुन्हा
लग्न नाकारल्यामुळे हल्ला
आरोपी काही तासांत अटकेत
पोलीस तपास सुरू
आंध्र प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय मुलीची जीभ कापून आणि गळा चिरून तिची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिची जीभ कापण्यात आल्याचे उघड झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव व्यंकटेश अंजनय्या असे आहे. व्यंकटेश हा कोटला गावचा रहिवासी आहे. त्याचं पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. या प्रेमातून त्याने मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र मुलीने ती मागणी धुडकावली. मुलीने स्पष्टपणे सांगितले होते की, ती तिच्या आई-वडिलांच्या संमतीनेच लग्न करणार असे असूनही, आरोपीने आपला हट्ट सोडला नाही. त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत गेले.
अशातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास तिचे मुलीचे आई-वडील बाहेर गेले असताना ती घरी एकटीच होती. याचीच संधी साधून व्यंकटेश जबरदस्तीने घरात घुसला आणि तिच्याशी लग्नावरून वाद घालू लागला. वाद वाढत गेल्यावर त्याने आपल्याजवळ असलेला चाकू काढून तिचा गळा चिरला. त्यानंतर मुलीची जीभ कापली. या आरडाओरड्याने शेजारचे लगबगीने घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच, खाझीपेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रिम्स-कडप्पा येथे पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.