Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

Delhi Ghaziabad Rape News : गाझियाबादमध्ये प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू.
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार,  रस्त्यावर फेकून दिलं नंतर...
Delhi Ghaziabad Rape NewsSaam Tv
Published On
Summary
  • गाझियाबादमध्ये महिलेवर धावत्या कारमध्ये अत्याचार

  • गुंगीचे औषध देऊन आरोपींनी गुन्हा केला

  • महिलेला निर्जनस्थळी फेकून आरोपी फरार

  • पोलिसांकडून तपास सुरू, गुन्हा दाखल

दिल्लीच्या गाझियाबादमधील तिलामोडमध्ये प्लॉट खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला कारमधून फेकून दिले आणि पलायन केले. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी प्रॉपर्टी डीलर विकास आणि आशू यांच्यासह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला हरियाणातील पलवलची रहिवासी आहे. ती प्लॉट खरेदी करण्यासाठी गाझियाबादमधील लोणी येथे आली होती. तिथे तिची भेट विकास आणि आशू या प्रॉपर्टी डीलर्सशी झाली. ६ एप्रिल रोजी दुपारी ती प्लॉट पाहण्यासाठी गाझियाबादला आली होती आणि लोणीकडे जात होती. प्रॉपर्टी डीलर्सने तिला तिलामोड येथे प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. तिथे महिलेचं आदरतिथ्य करण्यात आलं.

Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार,  रस्त्यावर फेकून दिलं नंतर...
Mumbai : बड्या मंत्र्यांसोबत फोटो, स्मार्ट व्हिलेजमध्ये गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टरने व्यवसायिकाला 1.13 कोटींना गंडा घातला

यादरम्यान कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकून देण्यात आलं. त्यानंतर विकास आणि आशू यांनी पीडितेला कारमध्ये जाऊन बसायला सांगितलं. महिलेला गुंगी आल्याने ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर धावत्या गाडीत आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता या नराधमांनी महिलेला एका निर्जनस्थळी फेकून दिले. ७ एप्रिल रोजी शुद्धीवर आल्यानंतर तिला भरतपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार,  रस्त्यावर फेकून दिलं नंतर...
Shocking : लग्नाला नकार दिल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, आधी जीभ कापली, नंतर गळा चिरून मुलीची हत्या

एसीपींनी सांगितले की, भरतपूर पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि ८ एप्रिल रोजी राजस्थान पोलिसांनी त्यांना माहिती न देता महिलेला संजय नगर येथील संयुक्त रुग्णालयात दाखल केले.सदर घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com