After 48 years of legal struggle, a Mumbai family finally secures rights to their Wadala flat following a landmark High Court ruling. Saam tv
मुंबई/पुणे

१९७८ साली ५० हजारांना घेतला फ्लॅट, पण पझेशनच मिळालं नाही; अखेर 48 वर्षांनी मिळाला न्याय; नेमके प्रकरण काय?

Mumbai Wadala Flat Case 48 Years High Court Verdict: वडाळ्यातील 1978 पासून सुरू असलेल्या फ्लॅट वादाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल दिला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: तब्बल 48 वर्षे न्यायासाठी लढा देणाऱ्या वडाळ्यातील एका महिलेच्या कुटुंबाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 1978 पासून प्रलंबित असलेल्या फ्लॅट व्यवहाराचे काम पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने देत खरेदीदारांच्या वारसांना मोठा न्याय दिला आहे.

या प्रकरणाची सुरुवात मे 1978 मध्ये झाली. एम. के. माधवन यांनी आपल्या मुलीसाठी वडाळा परिसरातील सुमारे 285 चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट 50 हजारांना खरेदी करण्याचा करार केला होता. त्यावेळी त्यांनी 30 हजार अॅडव्हान्स म्हणून भरले होते, तर उर्वरित 20 हजार नंतर देण्याचे ठरले होते. मात्र फ्लॅटचे मूळ मालक आर. सुब्रमण्यम यांनी पुढील व्यवहार पूर्ण केला नाही आणि फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नाही तर त्यांनी घेतलेली रक्कम परत करण्याचा प्रयत्न करत फ्लॅट स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला.

विक्रेत्याकडून फ्लॅटचा ताबा न मिळाल्यामुळे खरेदीदार एम. के. माधवन यांनी 1982 मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित राहिले. या काळात दोन्ही पक्षांतील मूळ व्यक्तींचे निधन झाले आणि त्यांचे वारस हा लढा पुढे चालवत राहिले.

न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने अखेर या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देत विक्रेता आर. सुब्रमण्यम यांच्या वारसांना फ्लॅटचा व्यवहार पूर्ण करण्याचे आणि ताबा देण्याचे आदेश दिले. तसेच खरेदीदार माधवन यांच्या वारसांना उर्वरित 20 हजार रक्कम आजच्या बाजारमूल्यानुसार सुमारे 25 लाख भरावी लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्याय मिळण्यास मोठा विलंब

या प्रकरणातून न्याय मिळण्यासाठी जवळपास अर्धशतकाचा कालावधी लागल्याचे समोर आले आहे. तरीही अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मालमत्ता व्यवहारांबाबत न्यायालयाचा दृष्टिकोन स्पष्ट झाल्याचे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा; माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

Mumbai : "मी पोलिस अधिकारी बोलतोय..." मुंबईतील तरुणीची क्रिकेटरकडून फसवणूक, ३२ लाख उकळले

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

Maharashtra News Live Update: नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

Blood Pressure : सावधान! उन्हाळ्यात अचानक ब्लड प्रेशर वाढतो? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT