auto rickshaw file photo  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत चाललंय काय? रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून मोबाईल आणि पैसे पळवले

Mumbai andheri crime news : मुंबईच्या अंधेरीत एका रिक्षा चालकाना मारहाण करून मोबाईल आणि पैसे पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या तासांत आरोपींना अटक केली आहे.

साम टिव्ही

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Crime : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात रिक्षा चालकावर चौघांनी चाकूने हल्ला करून रिक्षाचालकाजवळील मोबाईल आणि रोख रक्कम लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरानंतर रिक्षाचालकाने चौघांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्याा वाहनाच्या नंबरवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अवघ्या बारा तासांत चारही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती रात्र पाळीवर रिक्षा चालविण्याचे काम करतो. 24 सप्टेंबर रोजी पीडित वर्सोवा जेपी रोडवरील बस स्टॉप परिसरात रिक्षात फोनवर बोलत असताना चार जणांच्या टोळक्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावलं. त्यांच्याकडून मोबाईल आणि पंधरा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकाराचा त्यांनी विरोध केला, त्यानंतर एका आरोपीने हातावर चाकूने वार करून त्यांना दुखापत केली. त्यानंतर ते दोन दुचाकीवर बसून आरोपी पळून गेले. यासंदर्भात रिक्षा चालकाने वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

या गुन्ह्याची गंभीरता पाहून डीसीपी राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्युंजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तैनात करण्यात आली. या तक्रारीवरुन तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन आरोपी हे मेघवाडी परिसरात असल्याचे समजले.

पुढे पोलिसांनी सापळा लावून सर्व आरोपींना अवघ्या बारा तासात ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामुळे या सर्व आरोपींना वर्सोवा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. पुढे न्यायालयाने या सर्व आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनित अनिलकुमार तिवारी, (२० वर्षे), विकास ईश्वर खारवा, (२४ वर्षे), राहुल अशोक राणा, (२३ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन शिर्के, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि नागेश मिसाळ, पोउनि जाधव , सपोनि जाधव, पोउनि उगले, पोउनि पाटील तसेच गुन्हे पथकातील अंमलदार पो.ह. महाडेश्वर, पो.शि. गोसावी, रकटे, थोरात, भोईर, पो.ह. पवार पो.शि. ईनामदार, साबळे, पठाण, घाडगे या सर्व तपास पथकातील पोलिसांनी अथक परिश्रम करून अवघ्या बारा तासात आरोपींच्या मुसच्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT