Malvan Crime: माणूस की हैवान! भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना

Malvan Crime News: सायंकाळच्या सुमारास पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
Malvan Crime: माणूस की हैवान! भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना
Malvan Crime News:Saamtv
Published On

विनायक वंजारे| सिंधुदुर्ग, ता. २६ सप्टेंबर

Man Sets Wife On Fire: देशभरात महिला अत्याचाराच्या भयंकर घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बेंगळोरमध्ये एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटना ताज्या असतानाच आता मालवणमध्ये पतीने भर बाजारात पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Malvan Crime: माणूस की हैवान! भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच मालवणमध्ये पहिल्या पतीने पत्नीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रिती केळुस्कर (वय, ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुशांत गोवेकर असे आरोपी पतीचे नाव असून सध्या तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बुधवार (ता. २५ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास मालवण एसटी बसस्थानक परिसरात ही भयंकर घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रीती केळुस्कर या एका शॉपमध्ये काम करतात. काल सायंकाळच्या सुमारास पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Malvan Crime: माणूस की हैवान! भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime : ज्योतिषाकडे हात दाखवू म्हणून नेले अन् खुर्चीला बांधले; माजी नगरसेविकेच्या पतीसोबत घडले भयंकर

दरम्यान, वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पामध्ये तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मृतदेह लाल नाला प्रकल्पाच्या परिसरातील असलेल्या गावातील असल्याची माहिती आहे. यात दोन तरुणांचा तर एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. हे मृतदेह नेमके कोणाचे आहेत? याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

Malvan Crime: माणूस की हैवान! भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना
PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com