Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO
भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुक तोंडावर आल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यातच भाजप नेते पिचड पिता-पुत्रांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत. तर पिचडांच्या भेटीपुर्वीच जयंत पाटलांनी मोठा नेता तुतारी फुंकणार असल्याचा दावा केलाय..तर तुतारी फुंकणारा लवंगी फटाका निघेल, असा टोला महाजनांनी लगावलाय.
अकोलेतून सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे आमदार आहेत. तर महायुतीत ज्याचा आमदार त्याला जागा, हे सूत्र ठरल्याची चर्चा रंगलीय..त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मधुकर पिचड आणि वैभव पिचडांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जातंय.. मात्र फक्त अहमदनगरच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही पवारांनी महायुतीला सुरुंग लावल्याने दिग्गज नेते तुतारी फुंकणार असल्याची चर्चा रंगलीय.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यानंतर पवारांनी आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्राकडे वळवलाय.. तर 2019 च्या विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या पिचडांची घरवापसी करून शरद पवार अजित पवार, आणि भाजप असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र पवारांची ही रणनीती विधानसभेला यशस्वी ठरणार का? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.