Thane Crime: 'मला तू आवडत नाहीस, तुझे बाहेर'..; पतीच्या आरोपानंतर पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

Married Women Killed Herself: सासरच्या मंडळींकडून देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यात घडलीय.
Thane Crime: 'मला तू आवडत नाहीस, तुझे बाहेर'..; पतीच्या आरोपानंतर पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
Married Women Killed Herself
Published On

संशय आणि वारंवार देण्यात येणाऱ्या टोमण्यामुळे एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यात घडलीय. शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात ही विवाहिता राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या चौघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आलीय.

वारंवार संशय घेत टोमणे मारून, शिवीगाळ आणि मानसिक त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीकडून त्रस्त झालेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली . मला तू आवडत नाहीस, तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे आरोप करत विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती आणि मृत विवाहितेच्या सासरऱ्याला अटक केलीय. महिलेचा पती, सासू-सासरा आणि दीर या चौघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Thane Crime: 'मला तू आवडत नाहीस, तुझे बाहेर'..; पतीच्या आरोपानंतर पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
Nashik News: भयंकर! पतीची घरात आत्महत्या, मृतदेहासमोर पत्नीने पूजा मांडली अन् ... नाशिकमध्ये खळबळ

भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका म्हात्रे हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी याच्याशी झाला होता. मात्र तू मला आवडत नाहीस तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत. असे पती वैभव पत्नी कृतीकावर वारंवार संशय घेऊन तिला नेहमीच शिवीगाळ करायचा. तर सासरा जनार्दन, सासू रत्न, आणि दीर समीर याबाबत वारंवार टोमणे मारायचे बुलेट ट्रेनच्या प्रकरणात गेलेल्या जमिनीचे पैसे कधी येतील, असे वारंवार विचारून कृतिकाला शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होते.

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून कृतिकाने राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची तक्रार कृतिकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती व सासरा यांना अटक केली असून अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com