तबरेज शेख, नाशिक|ता. २२ सप्टेंबर
Nashik Crime: कौटुंबिक जाचातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली. धक्कादायक म्हणजे पतीने गळफास घेतल्यानंतर त्याच्या मृतदेहासमोरच बसून पत्नी पूजेचे साहित्य मांडून भक्ती करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् समोरचे भयंकर दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला. नाशिकराेड घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकराेड परिसरात कौैटुंबिक वादातून एकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनाथ घायवट असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून काैटुंबिक कलहातून त्यांनी आयुष्य संपवले. सर्वात भयंकर म्हणजे नवनाथ घायवट यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह असतानाच त्यासमोरच बसून त्यांची पत्नी पूजेचे साहित्य मांडून बसल्याचेही आढळून आले, ज्यामुळे पोलिसही हादरुन गेले. मात्र पत्नी मनोरुग्ण असल्याचा नातेवाईक आणि पोलिसांनी दावा केला आहे.
घटनेच्या दिवशी नवनाथ घायवट यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा केली होती. या आयोजित पूजेच्या दिवशीच दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून घायवट यांनी घरातील किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पतीने गळफास घेतला असताना त्यांच्या मृतदेहासमोरच पत्नी पूजा मांडून बसल्याचे निदर्शनास आले.
सुरुवातीला ही आत्महत्या जादूटोण्याचा आणि अंधश्रद्धेतून झाल्याची परिसरात चर्चा होती. मात्र पोलीस तपासात पत्नी ही मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.