Sharad Pawar: '१० दिवसात 'मविआ'चे जागावाटप, शरद पवारांनी सांगितली महत्वाची रणनिती; नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar ON MVA Seat Sharing Formula: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. येत्या १० दिवसात मविआचे जागा वाटप पुर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Sharad Pawar Dhule Visit: Saamtv
Published On

बारामती, ता. २२ सप्टेंबर

Sharad Pawar On Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन दावे- प्रतिदावे सुरु आहेत, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआच्या जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. येत्या १० दिवसात मविआचे जागा वाटप पुर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, तसेच लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत, असा दावाही त्यांनी केला. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याजिल्ह्यात इच्छुकांचा अभ्यास सुरु आहे. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते त्यांच्या मुलाखती घेतील, त्यानंतर तीन पक्ष मिळून निर्णय होईल. त्यामध्ये आमची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. तीन पक्षांनी मिळून निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे एखाद्या जागेवर कोणी निवडणूक लढवावी, याबाबतही एकवाक्यता असावी, अशी रणनिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून यासंबंधी तिन्ही पक्षांची मुंबईमध्ये बैठक सुरु आहे, आणि जागांचे वाटप करत आहेत, येत्या १० दिवसात हे संपवून प्रत्यक्षात लोकांच्यात जाण्याचा विचार आहे," असं शरद पवार म्हणाले.

राज्यात "सात वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या, त्यावेळी काँग्रेसचा खासदार निवडून आला, राष्ट्रवादीचे चार निवडून आले, यावेळी तीस लोक निवडून आले. तसेच महाराष्ट्रात आशादायक चित्र, मविआसाठी अनुकूल वातावरण आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला बाजूला करण्याच्या मनस्थितीत लोक आहेत. लोक परिवर्तन करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या कामाला आम्ही लागू," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Maharashtra Politics : शिंदे-पवाराचं टेन्शन वाढलं; ठाण्यात भाजपचा १२ जागांवर दावा, महायुतीत जागांसाठी रस्सीखेच?

"केजरीवाल उत्तम काम करत होते, त्यांना तुरुंगात टाकले गेले, खोट्या केसेस केल्या गेल्या. शेवटी एखादी व्यक्ती दुसऱ्या विषयावर जाऊ शकते त्यांनी सांगितले आणि राजीनामा दिला. त्यानंतर कोण येतायेत हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय होता, पण त्यांनी ज्यांची निवड केली त्यांचे काम आम्ही पाहतो. कर्तुत्वान अभ्यासू हुशार विचारवंत महिला आज दिल्लीची मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतेय ही अतिशय चांगली गोष्ट आहे.. यांच्या अगोदर दोन भगिनींनी दिल्लीचे नेतृत्व केलं दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा उंचावला तिच परंपरा या भगिनी सातत्य ठेवून करतील याचा मला विश्वास आहे आणि आम्हा लोकांच्या शुभेच्छा आहेत," असंही शरद पवार म्हणाले.

खबरदारी घ्या..

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील धनगर- ओबीसी आरक्षण आणि संघर्षावरही सरकारचे कान टोचले. "असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढायचं काही कारण नाही. शेवटी आपण सगळे जण जात धर्म काही असो भारतीय आहोत. राज्य सरकारने आपल्या सगळ्यांच्या मध्ये सामंजस्य कसं करता येईल भूमिका या क्षेत्रात विषयात जे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारने सुध्दा लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्याची पूर्तता कशी करता येईल ते बघून वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी घ्या," असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Speech: सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद चढला; निवडणुकीत जागा दाखवू', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार कडाडले!
Dombivli Crime : मोबाईलपेक्षा अभ्यास कर, आईने सांगताच तरूणीने रागात उचललं टोकाचं पाऊल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com