Maharashtra Politics : शिंदे-पवाराचं टेन्शन वाढलं; ठाण्यात भाजपचा १२ जागांवर दावा, महायुतीत जागांसाठी रस्सीखेच?

BJP claims 12 seats in Thane district : राज्यात महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. ठाणे जिल्ह्यात भाजपने १२ जागांवर दावा केलाय.
  महायुती
Mahayuti Saam TV
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत तोंडावर येवून ठेपली आहे. ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं दिसतंय. मागील निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये १८ विधानसभा जागांपैकी नऊ जागांवर भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. यंदा ठाणे जिल्ह्यात १२ जागांवर भाजप मागणी करत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला पालघर जिल्ह्यामध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हतं, परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली होती. त्यामुळे पालघरमध्ये देखील जागा मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचं (BJP claims 12 seats in Thane) चित्र आहे. ठाणे जिल्ह्यामधील जास्तीत जास्त जागा पदरात कशा पाडून घेतल्या जाऊ शकतात, याची चाचपणी भाजप करताना दिसत आहे.

जागा मिळविण्यासाठी भाजपची धडपड

भाजपने जिल्ह्यातील मतदारांचा देखील आढावा घेण्यास सुरूवात (Mahayuti Seat Sharing) केलीय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ज्येष्ठ नागरिकांच्या मतांवर भर देताना दिसत आहे. विधानसभानिहाय ज्येष्ठ मतदारांची संख्या, त्यांचे मतदान करवून घेण्यावर भर दिला जातोय. ज्येष्ठ नागरिकांच्या थेट घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी भाजपचे नेतेमंडळी आवाहन करणार आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना भेट देण्याचं निश्चित केलंय.

  महायुती
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी! राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार, महत्वाची अपडेट आली समोर

जागांची तीन गटांत वर्गवारी

विधानसभा निवडणुकीमध्ये ठाण्यात बाजी मारायची, अशी भूमिका अमित शाह यांनी घेतल्याचं (Vidhan Sabha Election) दिसतंय. यासाठी भाजपने विधानसभानिहाय जागांची तीन गटांत वर्गवारी केली आहे. यावेळी महायुतीमध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे घेण्याकरिता भाजपने विधानसभा जागांची 'अ', 'ब', 'क' अशी तीन गटांत विभागणी केली आहे.

भाजपने'अ' श्रेणीच्या जागांवर दावा केलाय. तर 'ब' श्रेणीतील जागांवर भाजप मतदान वाढवण्याकरिता प्रयत्न करणार आहे.'क' श्रेणीतील जागांवर मतदानाचा टक्का (Maharashtra Politics) वाढवण्यावर भर देण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळतेय. या बैठकांना महिला आघाडीच्या अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष उपस्थित राहतील, असं समोर आलंय.

  महायुती
Assembly Election: भाजप-अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी; महायुतीत वादाची ठिणगी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com