Wardha Crime: रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळले ३ मृतदेह, वर्ध्यातील घटना; परिसरात खळबळ

Wardha Latest News: धरणाच्या कडेला असलेल्या बेशरमच्या झाडात हे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती गिरड पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
Wardha Crime: रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळले ३ मृतदेह, वर्ध्यातील घटना; परिसरात खळबळ
Wardha Latest News: Saamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा|ता. २६ सप्टेंबर

Three Dead Bodies Found: वर्ध्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्ध्याच्या लाल नाला प्रकल्पात तीन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन तरुणांचा तर एका वृद्ध व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

Wardha Crime: रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळले ३ मृतदेह, वर्ध्यातील घटना; परिसरात खळबळ
Maharashtra Politics: अर्थ खात्याचा विरोध डावलून बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, चर्चा न करताच सरकारचा निर्णय; 'मविआ'चे नेते संतापले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पामध्ये तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मृतदेह लाल नाला प्रकल्पाच्या परिसरातील असलेल्या गावातील असल्याची माहिती आहे. यात दोन तरुणांचा तर एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी सुलतानपूर येथील दोन तरुण वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता, रस्त्याच्या कडेला गाडी आणि मोबाईल पडून असल्याने दोघे वाहून गेल्याचा अंदाज बांधला जात होता.

त्यांचाच शोध सुरू असताना दोन्ही तरुणांचे मृतदेह लाल नाला प्रकल्पात आढळून आले आहे. यातच तिसरा अनोळखी मृतदेह देखील आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. रेस्क्यू टीमकडून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. धरणाच्या कडेला असलेल्या बेशरमच्या झाडात हे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती गिरड पोलिसांनी दिली आहे. गजानन भगत (वय 26) व सुदन बंडू भगत (वय 25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Wardha Crime: रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळले ३ मृतदेह, वर्ध्यातील घटना; परिसरात खळबळ
Crime News : बिल्डरच्या २० वर्षीय मुलाचं अपहरण, ४० कोटींची खंडणीचा फोन, अंबरनाथमध्ये काय चाललंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com