Mumbai Local news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; मान धरली अन् पाठीत बुक्क्यांचा मार, VIDEO व्हायरल

Mumbai Local fight video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Vishal Gangurde

विरार-डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हाणामारीचे क्षुल्लक कारण समोर

रुपेश पाटील, साम टीव्ही

पालघर : मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे असो वा पश्चिम रेल्वे... या तिन्ही मार्गावरील प्रवाशांना दररोज गर्दीचा सामना करावा लागतो. लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना साधं उभं राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नसते. त्यामुळे या लोकलमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून भांडणे होतात. याच क्षुल्लक कारणावरून हाणामारीच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशाच रेल्वे प्रवाशांच्या हाणामारीची घटना विरार-डहाणू लोकलमध्ये घडली आहे. प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी झाली. विरारवरून डहाणूसाठी सुटलेल्या 3:45 वाजताच्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना घडली आहे. सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाली.

ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याने हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. एकमेकांना धक्का लागल्याने हा वाद वाढल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या वादानंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मात्र यावेळी रेल्वे डब्यात कोणताही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हाणामारी आणखी वाढली.

डहाणू ते वैतरणा या भागात असे प्रकार नेहमीच समोर येत असून मागील काळात पासधारक प्रवाशांकडून काही अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करण्यात येत असल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT