M2M Princess Ro-Ro ferry departs from Mumbai’s Bhaucha Dhakka for Vijaydurg, reducing Konkan travel time to just six hours. Saam Tv
मुंबई/पुणे

शिमग्याला कोकण गाठा अवघ्या ६ तासांत; मुंबईहून रो-रो सेवा सुरू, किती असणार तिकीट?

Mumbai To Vijaydurg Ro-Ro Ferry Ticket Price And Timing: मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो बोट सेवा १ मार्चपासून सुरू होत असून अवघ्या सहा तासांत कोकण गाठणे शक्य होणार आहे. प्रवास वेळापत्रक, तिकीट दर आणि वाहन वाहतुकीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Ganesh Kavade

महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई – कोकण प्रवास अतिजलद करता यावा यासाठी मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑगस्ट २०२५ मध्ये, गणेशोत्सवादरम्यान ही सेवा सुरू होणार होती. मात्र काही कारणांमुळे ती सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात बोटीने कोकणात जाण्याचे प्रवाशांचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता मात्र शिमग्यात रो-रो सेवेद्वारे केवळ सहा तासांत कोकण गाठता येणार आहे.

रखडलेल्या या सेवेसाठी अखेर १ मार्चचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून १ मार्चपासून मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होत आहे. भाऊचा धक्का येथून १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पहिली ‘एम टू एम’ बोट सुटणार आहे. मात्र या अतिजलद जलप्रवासासाठी प्रवाशांना तीन हजार ते नऊ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई – कोकण असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प अनेक वर्षे रखडल्याने रस्ते मार्गे प्रवास वेळखाऊ आणि गैरसोयीचा होत आहे.

तर रेल्वे किंवा एसटीने कोकण गाठण्यासाठी किंवा कोकणातून मुंबईत परतण्यासाठी १२ ते १४ तास लागतात. त्यातही गणेशोत्सव काळात प्रवास अत्यंत आव्हानात्मक होतो. या पार्श्वभूमीवर जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून मुंबई – कोकण प्रवास सुसाट आणि सुकर करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला. त्यानुसार मुंबई – विजयदुर्ग असा जलमार्ग निश्चित करण्यात आला.

विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रो-रो जेट्टीत रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले. भाऊचा धक्का आणि विजयदुर्ग जेट्टी येथे आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. बोटीची चाचणीही पूर्ण करण्यात आली. ही सर्व तयारी पूर्ण करून ऑगस्ट २०२५ मध्ये गणेशोत्सवादरम्यान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि परवानग्या मिळण्यात आलेल्या विलंबामुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. आता १ मार्चपासून मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवास वेळापत्रक

मुंबई - विजयदुर्ग

▪ प्रत्येक बुधवार आणि शनिवार

▪ सकाळी ८ वाजता भाऊचा धक्का येथून प्रस्थान

▪ दुपारी सुमारे २ वाजता विजयदुर्ग येथे आगमन

विजयदुर्ग - मुंबई

▪ प्रत्येक गुरुवार आणि रविवार

▪ दुपारी १२ वाजता विजयदुर्ग जेट्टीवरून प्रस्थान

▪ सायंकाळी ६ वाजता मुंबईत आगमन

प्रवासी तिकीट दर

▪ इकोनॉमी – ₹३,०००

▪ प्रीमियम इकोनॉमी – ₹५,०००

▪ बिझनेस – ₹७,०००

▪ प्रथम श्रेणी – ₹९,०००

वाहनांसाठी दर

▪ एक्सएल (Extra Large) – ₹९,०००

▪ एल (Large) – ₹८,०००

▪ एम (Medium) – ₹७,०००

▪ एस (Small) – ₹६,०००

▪ दुचाकी – ₹१,०००

▪ सायकल – ₹६००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातल्या नद्या प्रदूषणावरून जलसंपदा मंत्र्यांनी प्रदूषण महामंडळाला फटकारलं

Puranpoli Recipe: ना डाळ शिजवायची कटकट, ना भांड्यांचा पसारा ही पद्धत वापरुन 10 मिनिटांत मऊ लुसलुशीत पुरणपोळी

Iran Attack: भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा हल्ला; होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातील जहाज रडारवर

खामेनी यांच्या मृत्यूनंतर युद्ध थांबणार? भारतात इंधनाचे भाव वाढणार? धक्कादायक माहिती समोर|VIDEO

Makeup Tips: मेकअप करताना कोणत्या चुका करू नयेत? परफेक्ट लूकसाठी या ७ सिक्रेट टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT