Kalyan : अंबिवलीमध्ये महिलेचा राडा, रेल्वेच्या पुलावरून मच्छिमारांवर दगड फेकले; नेमकं कारण काय?

Kalyan Aambivli Railway Station : अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्रेत्यांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेला मच्छीमारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून दगडफेकीमागील कारणांचा तपास सुरू आहे.
Kalyan : अंबिवलीमध्ये महिलेचा राडा,  रेल्वेच्या पुलावरून मच्छिमारांवर दगड फेकले; नेमकं कारण काय?
Kalyan Aambivli Railway StationSaam tv
Published On
Summary
  • अंबिवली स्थानकाबाहेर मासळी विक्रेत्यांवर दगडफेक

  • संबंधित महिलेला मच्छीमारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • पाच वेळा दगडफेक झाल्याचा आरोप

  • सुदैवाने कोणतीही दुखापत नाही

  • पोलिसांकडून तपास सुरू असून कायदेशीर कारवाई अपेक्षित

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमारांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल पाच वेळा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. त्याच प्रमाणे ही महिला बांगलादेशी असल्याचाही आरोप केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिवली स्थानकाबाहेरील परिसरात रोजप्रमाणे मच्छीमार मासळी विक्री करत असताना अचानक एका महिलेने रेल्वे ब्रिज वरून लपून दगडफेक सुरू केली. तिचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Kalyan : अंबिवलीमध्ये महिलेचा राडा,  रेल्वेच्या पुलावरून मच्छिमारांवर दगड फेकले; नेमकं कारण काय?
Today Horoscope : काहींचं प्रेम बहरणार, तर कुणाला आर्थिक अडचण येणार; कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

या घटनेनंतर संतप्त मच्छीमारांनी संबंधित महिलेला रंगेहात पकडून कल्याण रेल्वे पोलीस यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. दगडफेकीमागचे नेमके कारण काय, ही महिला कोण? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Kalyan : अंबिवलीमध्ये महिलेचा राडा,  रेल्वेच्या पुलावरून मच्छिमारांवर दगड फेकले; नेमकं कारण काय?
Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती

आम्ही रोजप्रमाणे इथे मासळी विक्री करत होतो.अचानक त्या महिलेनं रेल्वे ब्रिज वरून आमच्यावर लपून दगडफेक केली. एकदा नव्हे तर पाच वेळा दगडफेक झाली असल्याचे आरोप गोरख पाटील या मच्छीमाराने केले आहे. ही घटना अचानक घडली. मच्छीमारांनी संयम राखत तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ही महिला बांगलादेशी आहे का? किवा याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com