MMRDA Plans 70 km Underground Expressway for Smarter Mobility Saam
मुंबई/पुणे

रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

MMRDA Plans 70 km Underground Expressway for Smarter Mobility: वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका. भुयारी रस्ता रोड नेटवर्क प्रकल्पाला सुरूवात. ७० किमी लांबीचा हा प्रकल्प ३ टप्प्यांत पूर्ण होणार.

Bhagyashree Kamble

  • भुयारी रस्ता रोड नेटवर्क प्रकल्पाला सुरूवात.

  • हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार.

  • कोस्टल रोड, BKC अन् विमानतळ यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर प्रस्तावित.

महानगरात वाहतूक कोंडीचा फटका प्रत्येकाला बसतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. 'भुयारी रस्ता रोड नेटवर्क' असे प्रकल्पाचे नाव असून, या प्रकल्पाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम लवकरच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवून आणेल.

या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरूये. 'भुयारी रस्ता रोड नेटवर्क' हे रस्ते, मेट्रो आणि कोस्टल रोडसह शहरातील तिसरी वाहतूक व्यवस्था ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांची वेळेची बचत होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट प्रदूषण घटवणे तसेच वाहतुकीची क्षमता वाढवणे आहे.

या नेटवर्कगद्वारे मुंबई कोस्टल रोड, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हाय स्पीड रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडणारा मोठा भूमिगत कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे तसेच एस. व्हि रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सुमारे ७० किमी लांबीचा प्रकल्प ३ टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे.

पहिला टप्पा - वरळी सी - लिंक ते बीकेसी अन् विमानतळ लूप (१६ किमी)

दुसरा टप्पा - पूर्व - पश्चिमला जोडेल (१० किमी)

तिसरा टप्पा - उत्तर दक्षिण जोडणी (४४ किमी)

एमएमआरडीएच्या मते, मुंबईतील मर्यादित जागा आणि वाढत्या दाटीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सर्वाधिक व्यवहार्य उपाय असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री तसेच एमएमआरडीएचे अध्यक्ष यांनी पहिल्या टप्प्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अहवाल आणि डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांचे दान

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

अखेर मनोमिलन झालं! शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींची युती|VIDEO

SCROLL FOR NEXT