Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी, तिघांच्या अंगावर झाड कोसळलं; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai Rains Turn Deadly: मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे विक्रोळीत झाड कोसळलं. ३ तरुणांच्या अंगावर हे झाड कोसळलं. यामध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झालेत.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मुंबईत पहाटेपासून पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा फटका बसला. मुंबईत तिघांच्या अंगावर झाड कोसळलं. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले. विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या कन्नमवारनगर -२ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. गणेश मैदानामध्ये तीन मित्र गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी अचानक भलंमोठं झाड या तरुणांच्या अंगावर कोसळलं. या घटनेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे इतर दोन मित्र बचावले. तेजस नायडू असं या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे विक्रोळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश मैदानामध्ये असलेले हे जंगली झाड खूप वर्षे जुने होते. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे हे झाड अचानक कोसळलं. झाड अंगावर पडल्यामुळे तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे दोघे मित्र सुखरूप असून घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या झाडाला कापून तेजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी तेजसचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाला मदत करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यामुळे झाडं कोसळल्याच्या घटना या दरवर्षी घडत असतात. अशामुळे पावसाळ्यामुळे झाडाखाली उभं राहणं टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT