

मुंबई -
मुंबईतल्या कुलाब्यामध्ये झाडाची फांदी तुटून वाहनांवर पडली
महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाच्या आवारातील घटना
या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू
४ वाहनांचे मोठे नुकसान
नाशिक-
नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने पाऊस अन् गारपिटीचा इशारा दिला
आज पुन्हा नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नांदीन परिसरात संध्याकाळच्या सुमारास गारपीट व पावसाने हजेरी लावली
या पावसामुळे पुन्हा एकदा पिकांना फटका बसला
नाशिकमधील शेतकरी हवालदिल झाला
बीड -
बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक घटना
बांधकाम विभागाचा जीवघेणा हलगर्जीपणा
१२ फूट खोल ड्रेनेज खड्ड्यात माय-लेकी कोसळल्या
नाशिकच्या मालेगाव शहरात आज पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अतिक्रमण मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे
शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील शिवतीर्थ ते दरेगाव नाकापर्यंत ही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे
त्याच प्रमाणे शहरातील अन्य मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रम ही काढण्यात येणार असून,रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक तसेच नागरिकांना या पूर्वीच महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
अतिक्रम उधवस्थ झाल्याने मुख्य रस्त्यांनी मात्र मोकळा श्वास घेतला असला तरी शहरातील पूर्व भागात असलेल्या अनेक भागात आता मालेगाव महापालिका अशीच अतिक्रमण मोहीम राबवणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
चंदीगडमधील सेक्टर 37 परिसरात आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यालयाजवळ स्फोटासारखा आवाज झाल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
राजस्थान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा काँग्रेस पक्षाच्या भंडारा जिल्हा निरीक्षक संगीता बेनीवाल यांच्या वाहनाचा भंडाऱ्याच्या तुमसर येथील खापा चौकात भीषण अपघात घडला.
जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळ्याची माहिती समोर आली आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी ही घटना घडली आहे.
डोंबिवली MIDC निवासी भागात मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पाणी नसल्याने महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना मारहाण...
संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागातील घटना...
गाडीला कट मारल्याचा आरोप करत मारहाण केल्याची प्राथमिक माहिती...
तमाशा मंडळातील कलाकार मारहाणीत जखमी...
दुचाकी वरून आलेल्या दोघांनी इतर लोकांना बोलावून मारहाण केल्याची माहिती...
विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणगावकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप...
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू...
पुणे शहरातील पूर्व भागात पावसाला सुरुवात
चंदननगर, खराडी भागात पावसाला सुरुवात
राज्यात तीन दिवस अवेळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
परभणी शहरातील वसमत रोड परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक एका धावत्या ऑटोला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
-
गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पांसाठी 14 गावांमधील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आज बुधवारी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या ईच्छेविरूद्ध त्यांच्या जमिनी घेऊ नका, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नरेंद्र मोदी अमेरिकेचे गुलाम झाले आहेत, अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी घणाघात केला. ते आसाममध्ये बोलत होत्या.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गैरसोय होताना समोर आली आहे, रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना गैरसोईला सामोर जाव लागत आहे, रुग्णालयात कॉट नसल्याने, उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना जमिनीवर झोपून , सलाईन लावण्याची वेळ इथल्या डॉक्टरांवर आली आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
रत्नागिरी- गणपतीपुळे देवस्थानात मोफत नाश्ताचा 500 पर्यटकांनी घेतला लाभ
गणपतीपुळे देवस्थानाने भक्तांसाठी आज पासून मोफत नाश्त्याची व्यवस्था
गॅस पुरवठ्यावरील तुटवड्यामुळे पर्यटकांचे आणि भाविकांचे हाल होऊ नये या भावनेतून मंदिर प्रशासनाने हे पाऊल
आखातातील युद्धजन्य परिस्थितीने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठा अडथळा .
व्यावसायिक सिलेंडर अभावी मंदिर परिसरातील अनेक हॉटेल चालकांनी सेवा देण्यास असमर्थता दर्शविली
त्यामुळे भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थानाने घेतला निर्णय
कोल्हापूर शहरासह उपनगरात ही जोरदार पाऊस झाला. फुलेवाडी सह रंकाळा परिसरात गारांचा पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे कोल्हापूरकरांची एकच धावाधाव झाली.
- रील स्टारकडे मिळाला हत्यारांचा साठा
- महागड्या हत्यारंसह रिल स्टार माजवत होता दहशत
- सोशल मीडियावर कुप्रसिद्ध असलेल्या रिल स्टारला ठाणे क्राईम ब्रांचने केली अटक
- रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- ३ देशी बनावटीच्या पिस्टल, १ सिक्सर रिव्हॅालवर, ७ गावठी कट्टे, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, जिवंत १६७ छर्रे, २ तलवार, ३ लोखंडी कोयते, १ सुरा, २ चाकू, लोखंडी रॅाड, आणि ३
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचे मोठे विधान
कोकणात सर्वत मोठा पक्ष आमचा त्यामुळे तो क्लेम आमचा
येणाऱ्या लोकसभेची तयारी आमचे नेते करताहेत, आम्ही सर्व सज्ज आहोत
जिल्हा परिषदेत जे समिकरण झाल, ते आम्ही स्विकारल
वाटपात दोन नंबर आमचा लागेल
नाही मिळाल तर गेअर बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे
वर्ध्याच्या उमरी मेघे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार; गृहपालांच्या बदलीची मागणी
मेस, पिण्याचे पाणी,पंखे,लाईट, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधांवर विद्यार्थ्यांची तक्रार
गृहपालांच्या निष्क्रिय कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप
समाज कल्याण विभागाकडे चौकशी करून तातडीने कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी
हिंगोलीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने शेकडो व्यवसाय बंद पडले आहेत. किरकोळ व्यवसाय करणाऱ्या चहाच्या टपऱ्या हॉटेल आणि ब्रेकफास्ट चालवणाऱ्या व्यावसायिकांवर व्यवसाय बंद झाले आहेत. उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे गॅस एजन्सी धारकांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर वाटप करताना नियमांचे पालन होत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर हिंगोलीच्या पुरवठा विभागाने एचपी गॅस एजन्सी कार्यालयामध्ये दाखल होत व्यावसायिक गॅस सिलेंडर प्राधान्यक्रमानुसार वाटप होत आहे किंवा नाही याची तपासणी सुरू केली आहे.
हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार दुपारी अचानक जोरदार गारपिटीला सुरुवात
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकाचे झाले होते आतून आतून नुकसान
आता पुन्हा एकदा सुरू असलेल्या गारपीटीमुळे उर्वरित शेती पिकांचे देखील नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती
पहिल्या गुन्ह्यात आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर खराची रवानगी करण्यात आली होती नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात
उद्या SIT कडून अशोक खरात याचा ताबा घेतला जाण्याची शक्यता असतानाच आजच SIT ने घेतला खरातचा ताबा
अशोक खरातला घेऊन SIT पुन्हा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये दाखल
काही महिन्यांपूर्वी झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्रपरवान्यांची चर्चा झाली होती. या घटनेनंतर तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातील सर्व शस्त्रपरवान्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सुपेकर आणि हगवणे यांच्यातील नातेसंबंधांमुळे सुपेकर यांनी काही व्यक्तींना शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.
घाटकोपर येथे छेडा नगर या ठिकाणी ब्रिजेखाली उभ्या असलेल्या रिक्षांना आग
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन अधिक गाड्या दाखल
प्राथमिक माहितीनुसार आठ हून अधिक रिक्षांना अचानक आग
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील आमगाव येथे शेतात काम करत असताना वाघाने महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही १५ दिवसांतील तिसरी घटना असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. जखमी महिलेवर साकोली येथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील माढा येथील अंजनगाव खेलोबा येथे पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला. बिरोबा मंदिर परिसरातील जागा ट्रस्टची असल्याचा दावा धनगर समाजाने केला असून कारवाईची मागणी केली आहे. धनगर व मराठा समाज आमनेसामने आल्याने तणाव वाढला. पोलिसांनी बंदोबस्त वाढवत जमावबंदी लागू केली असून जागेच्या मालकीची तपासणी सुरू आहे.
जालना शहरातील नागेवाडी टोलनाका परिसरात पहाटे गोरक्षकांनी गोमांस असल्याच्या संशयावरून हवाबंद मांसाचे तीन कंटेनर पकडले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कंटेनरसह तीन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मांसाचे नमुने तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथून हे कंटेनर मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई आग्रा महामार्गावर डंपरणे दोन दुचाकींना चिरडल्याने या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणा जवळ मागून येणाऱ्या डंपरने दोघात दुचाकींना चीरडले
या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मध्ये काका पुतण्याचा देखील दुर्दैवी मृत्यू
पोलिसांनी तात्काळ डंपर चालकासह डंपर घेतले ताब्यात
या अपघातामुळे परिसरात एकच हळहळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची आज दुपारी १२.३० वाजता वांद्रे येथील मातोश्री येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. विविध धोरणात्मक निर्णयांसह पक्षाची पुढील दिशा निश्चित करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सत्ताधारी भाजपला मोठा धक्का
58 वरून 60 वर्ष सेवानिवृत्तीचा प्रस्ताव राज्यसरकारने फेटाळला..
नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली होती..
महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्यसरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता
मात्र चारच दिवसात राज्यसरकारने प्रस्ताव फेटाळला..
सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध !
चार विषय समिती सभापती निवडणुकीसाठी चार जणांचेचं अर्ज दाखल
बांधकाम समिती सभापती पदी शिंदे सेनेचे पृथ्वीराज पाटील
महिला व बालकल्याण सभापती पदी स्नेहल मोरे
शिक्षण सभापती पदी सावित्री तांमगोंडा पाटील
समाजकल्याण सभापती पदी दादासाहेब कोळेकर यांनी भरला अर्ज.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी नंतर महाविकास आघाडी,शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाची सभापती निवडीतही बाजी !
पुण्यात आजपासून पालिकेनं हवेत लटकणाऱ्या अनधिकृत केबल्स तोडण्याची धडक मोहिम हाती घेतलीय, विविध टेलिकॉम कंपन्या, केबल्स ऑपरेटर्सच्या या सर्व अनधिकृत केबल्सचं जाळं वर्षानुवर्षे शहरभर पसरलंय त्यातून पालिकेचा प्रचंड महसूल बुडतोय...आकाशात लटकणाऱ्या या केबल्सचं जाळं अंडरग्राऊंड टाकलं तर पालिकेला त्यातून 800 कोटींचा महसूल मिळू शकतो, असा दावा पुणे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केलाय
अशोक खरातवर जैन धर्मियांनी गुन्हा दाखल करावा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जैन धर्माला आवाहन
मासा शाकाहारी असल्याचं सांगत जैन धर्माची खरातने केली फसवणूक
पाण्यातील वनस्पती असल्याचा दावा करत माश्यात रक्त नसतं म्हणून जैन लोकांना खाऊ घातलं
जैन लोकांच्या स्वातंत्र्यावर अन्याय केल्याचा अंनिसचा दावा
कर्जाच्या बोज्यात बुडालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच उत्पन्न वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने एक मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी अभय योजना लागू केली होती. या अभय योजनेत पिंपरी चिंचवड महापालिकेला मागील एक महिन्यात जवळपास पा 4919 कोटी 58 लाख रुपयाचं कर संकलन करण्याचे लक्ष गाठता आलं आहे. कर संकलन विभागाने 5577 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलं होतं त्यापैकी 4919 कोटी 58 लाख रुपयाची मालमत्ता कर महापालिकेच्या कर संकलन विभागाने गोळा केला आहे. मात्र त्या तुलनेत भूमी जिंदगी आणि आकाश चिन्ह विभागाला त्यांचं कर संकलन करण्याच लक्ष गाठता न आल्याने 660 कोटी 42 लाख रुपयांची तूट या वर्षीच्या आर्थिक वर्षात महापालिकेला भरून काढावी लागणार आहे.
अमरावतीच्या दर्यापूर शहरात आजही घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, सकाळपासून गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावर सकाळपासून रांगा लागल्या आहेत, जवळपास 500 ते 700 मीटर पर्यंत खाली सिलेंडर घेऊन नागरिक दर्यापूर येथे सिलेंडर घेण्यासाठी पोहचले आहे..
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आज कोर्टाल झाली सुनावणी
भोंदू अशोक खरात कोर्टात हजर
खबरदारीचा उपाय म्हणून कोर्टामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
आज पोलिस कोठडी संपणार आहे
खरातला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड
खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग
सरकारवाडा पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
संशयित चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक
व्हॅनमध्ये बसवताना-उतरवताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप
भीतीपोटी मुली व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा प्रकार आला उघडकीस
8-9 मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती तपासात समोर
पालकांमध्ये तीव्र संताप, शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काल रात्री उशिरापर्यंत अशोक खरातच्या मुलाची चौकशी
चौकशीनंतर अशोक खरातच्या मुलाला SIT ने सोडून दिलं
खरातच्या मुलाची चौकशी करून रात्रीच सोडून दिलं
काही तासांच्या चौकशीनंतर हर्षवर्धन खरातला SIT ने सोडून दिल्याची माहिती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि धनगर समाजाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते दिलीप एडतकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून तशा अर्थाचा ई-मेल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांना पाठविला आहे. दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असून काँग्रेस पक्षाचे सक्रिय होते मात्र अलीकडे काँग्रेसची गटबाजी आणी ध्येय धोरणावरती ते नाराज आहेत.. त्यांच्या निमित्ताने धनगर समाजातील मोठ नेतृत्व काँग्रेसकडे होतं,
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात सीप्ज कंपनीला मोठी आग लागली आहे
सीप्ज कंपनीमध्ये असलेला एका केमिकल कंपनीला ही मोठी आग लागली
सकाळी पावणेदहाच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक आग लागली, कंपनीमध्ये असलेले कर्मचारी आत मध्ये अडकल्याच्या भीती व्यक्त केले जात आहे
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच गाड्या आणि एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी आणि अडकलेले लोकांना बाहेर रेस्क्यू करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मात्र काचेची इमारत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इमारतीमध्ये धूर पसरला आहे....
आग कशामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट नाही
मावळच्या ओझर्डे गावचा रायाजी घारे हा चिमुकला महाराष्ट्रातील सर्वात लहान गिरीरोहक ठरला असून, त्याने आतापर्यंत तब्बल १९ गड-किल्ल्यांवर यशस्वी चढाई करत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ४० दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधील तीन सर्वोच्च शिखरे सर करत त्याने विक्रम नोंदवला असून, या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे....
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत धोत्रा नंदाई शिवारात कांद्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून बेकायदेशीर अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून सुमारे 44 लाख 53 हजार 200 रुपयांची 1.11 क्विंटल अफूची झाडे जप्त केली. या प्रकरणी सरंबा येथील संजय तुकाराम चेके याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत...
विदर्भातील उन्हाचा तडाखा बघता शाळा या 26 जून ते 1 जुलै दरम्यानच सुरू करण्यात यावा अशी मागणी
15 जून पासून शाळा सुरू झाल्यास विध्यार्थ्यांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो
शासनाने विदर्भात हा निर्णय बदलला नाही तर शिक्षक संगठना रस्त्यावर उतरेल त्याच प्रमाणे कोर्टाचा अवमान होत असेल तर पुन्हा कोर्टात जाणार
- 15 जूनच्या दरम्यान विदर्भातला तापमान पाहता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधा बघितल्या आणि याचा विचार केला तर 15 जूनला शाळा सुरू करणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते..
- सकाळच्या सत्रात शाळा घेतल्या तरी बारा वाजता विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर ग्रामीण भागात दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून ते भर दुपारचा ऊन असेल आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरेल...
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सद्य बंद आहे, नाणे टंचाई आणि आर्थिक वर्षाची जुळवा जुळव करण्याची कारण देत 4 एप्रिल पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते.. मात्र बाजार समिती सलग तीन दिवसाच्या वर बंद ठेवता येत नाही,असा पणनचा नियम आहे, यावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बाजार समिती उघडण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आश्वासन देऊनही बाजार समिती उघडण्यात आले नाही यासंदर्भात आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आहे
शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण कोकणच्या विभागीय संपर्कप्रमुख पदावर राजापूरचे आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुख नेमतानाच विभागीय संपर्कप्रमुखही नेमले आहेत.
आमदार किरण सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक वर्षे संघटनात्मक पातळीवर काम केल्यानंतर किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तरीही संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड कायम आहे.
लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी शासनाकडून 9 कोटी 88 लाख 10 हजार रुपयांचा नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र यापूर्वीच सुमारे 123 कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात विकास व संवर्धनाची ठोस कामे दिसून येत नसल्याने लोणारवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढतच आहे.. यावर आता मंजूर झालेल्या निधी योग्य पद्धतीने खर्च करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे... तसेच मागील काळातील केलेला निधी खर्चाचा हिशोब पारदर्शकपणे मांडावा आणि प्रत्यक्ष कामे व्हावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे....
लातूर जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेत रस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाने सोडवला आहे. दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, लातूरच्या कासारखेडा महसूल मंडळात महसूल विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत, कायदेशीर प्रक्रियेनुसार शेत रस्त्याच्या वादाचा निपटारा केला आहे.
भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून भरत होता आयकर
तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात, तर १२ लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत असल्याचं समोर
आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय
आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता
पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई
तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल
तर 852 वाहनांवर पुणे पोलिसांकडून जप्तीची कारवाई
शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात राबवली विशेष मोहीम
तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर करण्यात आली कारवाई
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी बाळासाहेब रोचकरी यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे थेट शेतात उभ्या कांद्यावर ट्रॅक्टर चालवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.सुमारे दीड एकर क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड करण्यात आली होती.या पिकासाठी अंदाजे 70 ते 75 हजार रुपये खर्च झाला होता.योग्य बाजारभाव मिळाला असता तर अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र सध्या बाजारात कांद्याचे दर अत्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर कांद्याचे पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी व गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर एप्रिल महीन्यात ही वादळी वारे व अवकाळीचे सावट घोंगावणार आहे.1 ते 4 एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वादळी वारे व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या अवकाळी पावसामुळे आंबा,खरबुज,टरबुज ज्वारी सह भाजीपाल्यांना फटका बसणार आहे.धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात वीज पडून तब्बल 12 जनावरे दगावली आहेत त्यामुळे अवकाळीच्या तडाख्यात वीज पडण्याची अधिक शक्यता असते नागरीकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केल आहे.
- गेल्या तीन दिवसांपासून 40° च्या वर गेलेला उन्हाचा पारा सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे घसरला
- नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पाऱ्याची चार अंशांची घसरण
- काल नागपूरचा पारा 36.6° वर
- विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातही दोन ते सहा अंशाने तापमान कमी झाल्याने विदर्भ 40° च्या खाली
- हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे
- त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार
कोंढवा खुर्द परिसरातील वृंदावन सोसायटी आईमाता मंदिराजवळ असलेल्या गादी तयार करण्याच्या कारखान्याला काल मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली.
गंगाधाम व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रांतील अग्निशमन जवानांनी तत्काळ कारवाई करत १ लाईन होज व १ लाईन होज रीलच्या सहाय्याने पाण्याचा मारा सुरू केला. तसेच कारखान्याचे पत्रे तोडून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
शिवनेरी हापूसला या गारपिटीचा जबर फटका बसला असून आंब्याच्या बागांमध्ये अक्षरशः फळांचा खच गळून पडलेला पाहायला मिळतोय. काही मिनिटांच्या गारपिटीने शेतकऱ्यांचे महिन्यांचे कष्ट उद्ध्वस्त झाले असून आंबा उत्पादक शेतकरी हतबल झालाय.या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असून प्रशासनानेही या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या आठवडाभरात तिसऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीच्या शेजारी दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरलीय. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीच्या जवळ येत असल्याने पाळीव जनावरांवर हल्ल्याचा धोका निर्माण झालाय, तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय.या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे
शासनाने हॉटेल व्यवसायासाठी वापरल्य जाणाऱ्या व्यवसायीक गॅस सिलेंडर वितरणावर निर्बंध घातल्याने याचा फटका पर्यटन स्थळांवरील हॉटेल व्यवसायीकांना बसताना दिसत आहे. रायगडला विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. येथे वर्षाचे बारा महिने पर्यटन चालते. मात्र आत्ता पर्यटक बुकिंगचे वेळी गॅस सिलेंडर आणि जेवणाच्या सुविधेची आवर्जुन चौकशी करत असल्याचे येथील व्यवसायीकांचे म्हणने आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे तर चुलीवरच जेवण मिळणार याचा विषेश आनंद देखील काही पर्यटकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळखला जाणारा धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग मोठ्या अडचणीत आला आहे.आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या फटका उद्योगावर झाल्याचं पाहायला मिळत असून फटाका निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर हे दुपटीने वाढले आहेत.फटका बनवण्यासाठी सुतळी, प्लास्टिक सल्फर यासारखे पदार्थ लागतात हे कधी परराज्यातून तर कधी विदेशातून आणावे लागतात याचे दर वाढले आहे,परिणामी मालाचे दर वाढले आहेत त्यातच काही ठोक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्यांनी इसार घेतला आहे
शिंदेसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलते राजकीय समीकरण लक्षात घेऊन राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी विविध स्तरांवर नियुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत या निर्णयाअंतर्गत पश्चिम विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख पदी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून विभागीय सहसंपर्क प्रमुख पदी पराग पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील मुख्य चौकातील विविध रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यासाठी पालिकेने रस्त्यांचे खोदकाम केले मात्र पालिकाने रस्त्यावर डांबरीकरण करण्या ऐवजी चक्क माती टाकल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये,त्यामुळे रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जातेय.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका कथित आर्थिक व्यवहारावरून आणि फ्लॅट भेट दिल्याप्रकरणी केलेल्या आरोपांचा थेट प्रत्युत्तर माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केले आहे.
त्यांना फ्लॅट गिफ्ट केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अंधारे यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पदाधिकाऱ्याची भूमिका:
"सुषमा अंधारे या एक सुजाण सामाजिक कार्यकर्त्या आणि एका मोठ्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. मात्र, त्यांनी पूर्ण माहिती न घेता माझ्यावर केलेले आरोप हे वैयक्तिक आकसातून केलेले दिसतात," असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "अशोक खरात यांच्याशी माझी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली होती, हे मी नाकारत नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक लोकांशी आमचे फोटो निघतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आमचे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.