
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये आभार फाटल्यासारखी स्थिती झालीय. पुणे आणि साताऱ्या जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बारामतीमध्ये नागरिकांच्या बचावासाठी NDRF चे पथक देखील दाखल झालंय. या पावसात पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालीय. मुंबईत पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झालीय. यंदा पावासने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय.
मागील चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूय. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीय. अनेक गावातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. दरम्यान या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. रविवारी संध्याकाळपासून पाऊस सुरू आहे.
आताही पुढील ३ ते ४ तासांसाठी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी जोरदार वारे देखील वाहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलंय. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय.
गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 135.4 मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबईच्या पूर्व उपनगरांत 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरात 15 मिमी पाऊस झाला आहे. सायनमध्ये 43 मिमी तर मुंबई विमानतळ भागात 33 मिमी पाऊस झाला. झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह पनवेल, रायगडमध्ये पाणी साचलं. किंग्ज सर्कल, हिंदमातासारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. मुंबईतील लोकल सेवा त्यामुळे विस्कळीत झालीय. मेट्रो आणि विमान सेवेलाही पावसाचा फटका बसलाय.
मुंबईत झालेल्या पावसाने 107 वर्षाचा रेकॉर्ड मोडलाय. मे महिन्यात मुंबईत 107 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडलाय. या पावसाने मागील सर्व विक्रम मोडलेत. मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केलाय. 16 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय. 11जूनला दाखल होणारा मान्सून यंदा 26 मे रोजी दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. यापूर्वीच मान्सून मुंबईत दाखल झाला होता. 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत पावसाचे आगमन झाले होतं.
कुलाबा - 105.2 मिमी
सांताक्रूझ - 55.0 मिमी
वांद्रे - 68.5 मि.मी
जुहू विमानतळ - 63.5 मिमी
टाटा पॉवर चेंबूर - 38.5 मि.मी
विक्रोळी - 37.5 मि.मी
महालक्ष्मी - 33.4 मिमी
सायन - 53.5 मिमी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.