Shreya Maskar
लापशी बनवण्यासाठी लापशी, तेल, जिरे, कांदा , लसूण, गाजर, घेवडा, वाटाणे, ढोबळी मिरची, टोमॅटो, हळद, मीठ, पाणी, कोथिंबीर आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.
लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम तूप किंवा तेलात लापशी हलकी भाजून घ्या. शिजवण्यापूर्वी लापशी धुवून १० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
कुकरमध्ये थोडे तेल गरम करून त्यात जिरे घाला. कांदा आणि लसूण घालून हलके परतून घ्या. नंतर सर्व भाज्या घालून ४-५ मिनिटे शिजवा.
मिश्रणात हळद, मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला. आता भिजवलेली लापशी आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. लापशी शिजल्यावर एका ताटात काढा आणि वरून लिंबू हिरवीगार कोथिंबीर घालून गरमागरम खा.
तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर लापशीमध्ये जास्त तेल किंवा तूप घालणे टाळा. लापशी फक्त १०-१५ मिनिटांत तयार होते.
जास्त बटाटे घालू नका. भाज्या माफक प्रमाणात घाला. मीठ मर्यादित ठेवा. तुम्ही यात मूग किंवा इतर कडधान्य घालू शकता.
लापशी हे भरपूर फायबर, कमी कॅलरी असलेले जेवण आहे, जे वजन कमी होण्यास मदत करते.