Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर आहेत. ओट्समध्ये फायबर भरपूर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, भूक नियंत्रणात राहते.ज्यामुळे कॅलरीज कमी असतात. त्यामुळे नाश्त्याला झटपट ओट्स इडली बनवा.
ओट्स इडली बनवण्यासाठी ओट्स, उडीद डाळ, चणा डाळ, दही, रवा, मोहरी, ढोबळी मिरची , गाजर, कोथिंबीर, हळद, कांदा, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
ओट्स इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ, ओट्स आणि चणा डाळ धुवून ४-५ तास भिजत ठेवा. नंतर, ओट्स, उडीद डाळ, चणा डाळ आणि रवा मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवा.
तयार पेस्टमध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धा चमचा मीठ घालून घट्ट पेस्ट बनवा. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, कांदा घालून मऊ होईपर्यंत परता.
आता त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेले गाजर आणि कोथिंबीर घालून हलके परतून घ्या. नंतर, या मिश्रणात अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
आता हे सर्व मिश्रण ओट्सच्या पीठात टाकून इडलीचे पीठ तयार करा. आता हे पीठ इडली स्टीमरमध्ये ओतून १० मिनिटे वाफवून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत ओट्स इडलीचा आस्वाद घ्या.