
ही दृश्य कुठल्या धबधब्याची किंवा स्विमिंग पुलमधील नाहीत....तर ही आहे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मुंबईतील भुयारी मेट्रो... पहिल्याच पावसात वरळीचं आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्यानं मेट्रो तीन तीन तेरा वाजलेत....
एवढंच नाही तर वरळीत भुमिगत मेट्रोचं छतही कोसळलंय. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तर मेट्रोचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरल्याची कबुलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.
सरकारकडून मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी, असं आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. काम अपूर्ण असल्यानं स्टेशनमध्ये पाणी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं.. त्यावेळी मेट्रोचं काम अपूर्ण असताना उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता... मात्र आता अवघ्या 7 महिन्यातच पहिल्या पावसानं मेट्रोच्या दाव्यांची पोलखोल केलीय...त्यामुळे मेट्रोनं सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय.
मेट्रो पाण्यात, प्रशासनाची सारवासारव
संरक्षक भिंत कोसळल्यानं आचार्य अत्रे स्थानकात पाणी
मेट्रो स्टेशनचं काम अजूनही अपूर्णावस्थेत
पाणी शिरलं तो मार्ग वापरात नाही
10 जूनपर्यंत संरक्षक भिंत उभारणार
2011 मध्ये मंजूर झालेल्या भुयारी मेट्रोचं 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलंय...तर या भुयारी मेट्रोसाठी 37 हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय... मात्र मुंबईतल्या पहिल्याच पावसानं फक्त मेट्रो स्टेशनच नाही तर तब्बल 37 हजार कोटीच पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.