Mumbai Rain : मुंबईकरांनो वाचा आणि थंड बसा; पहिल्या पावसातच 'मुंबई झाली तुंबई', प्रशासकीय यंत्रणेची पोलखोल

Mumbai Rain update : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. पावसानं मुंबईकरांचे पुरते हाल केले. कुठे लोकल सेवा ठप्प झाली, कुठे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं, तर कुठे गुडघ्याभर पाण्यातून मुंबईकरांना वाट काढून जावं लागलं. दिवसभर मुंबईतल्या चाकरमान्यांची कशी कोंडी झाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Mumbai Rain
Mumbai Rainfreepik
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

Mumbai Rain Update : यंदा महाराष्ट्रात मान्सून आठवड्यापूर्वीच दाखल झाला. आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या कारभाराची पोलखोल झाली. मान्सूनच्या आगमनानं सुखावलेला मुंबईकर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफीसला जायला निघाला खरा मात्र अपेक्षेप्रमाणेच ऱेल्वे इंडीकेटर शून्य दाखवत होता. रेल्वे रुळही पाण्याखाली गेले होते. पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वसेवा म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. पण मे महिन्यातल्या या पावसानं ती पहिल्याच फटक्यात कोलमडली.

लोकल रखडली म्हणून काहींनी रस्तेवाहतुकीचा मार्ग निवडला.मात्र तिथेही तीच तऱ्हा..जोरदार पावसानं उपनगरापांसून दक्षिण मुंबईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाण्याने भरलेल्या रस्त्यातून, गटाराच्या पाण्यातून वाट काढत कर्मचाऱ्यांनी मंत्रालय परिसर गाठला खरा मात्र तिथंही आपापल्या ऑफिसपर्यंत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत चालत जावं लागलं. दुसरीकडे केईएम रुग्णालयातल्या कॅरीडोअरपर्यंतही पावसाचं पाणी पोचलं.

Mumbai Rain
Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाचा दुसरा बळी; इमारतीचा स्लॅब कोसळून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू, २ मुले झाली पोरकी

दरम्यान काही चाकरमन्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला पण तिथे तर पायऱ्यांवरच पाण्याचे लोट वाहत होते..मेट्रो स्टेशनची पहिल्याच फटक्यात दुर्दशा झाली.

Mumbai Rain
Mumbai Rain: मुंबईची दैना! विमान आणि रेल्वे सेवा ठप्प, मेट्रो स्टेशनमध्ये पाणी तुंबलं; पावसाने मोडला 107 वर्षांचा रेकॉर्ड

मुंबईची तुंबई होऊ देणार नाही, असं पावसाआधी आश्वासन नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी, देत असतात. मात्र यावेळी आठवडाभर आधी दाखल झालेल्या पावसांनं सगळीच आश्वासन पाण्यात वाहून गेली. खर तर देशाच्या आर्थिक राजधानीत राहत असलेल्या मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो.मात्र .एवढे धक्के खाऊनही मुंबईकर जागा होत नाही... ये रे माझ्या मागल्या म्हणत दरवर्षी ही जीवघेणी कसरत सहन करणाऱ्या मुंबईकरांच्या सहनशीलतेला सलामच करायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com