Vaishnavi Hagawane : फरार हगवणेंची 7 दिवसांत 11 ठिकाणं, अखेर सुस्त पोलिस यंत्रणा जागी

Vaishnavi Hagawane News : वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नराधम राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या मुसक्या आवळल्या....मात्र तब्बल 7 दिवस हे हगवणे बापलेक कुठल्या बिळात लपले होते? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Vaishnavi Hagawane
Vaishnavi HagawaneSakal
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

घरातल्या सुनेचा हुंड्यासाठी बळी घेतला आणि नंतर अटकेच्या कारवाईला घाबरत फरार असलेल्या हगवणे पिता-पुत्रांना अखेर सात दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्वारगेट परिसरातून या दोघांना ताब्यात घेतलंय त्याआधी 7 दिवस वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पुणे परिसरात मोकाटपणे फिरत होते.मात्र राज्यात वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी संतापाचा उद्रेक व्हायला लागल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि पोलिसांनी त्यांना स्वारगेट परिसरात अटक केली. अटकेपूर्वी हे दोघं बापलेक कुठे कुठे लपले होते ते पाहूयात.

17 मे 2025

इंडिवर कारने औंध रुग्णालय़ात वैष्णवीचा मृतदेह

पाहण्यासाठी गेले

अटक होण्याची शक्यता लक्षात येताच गाडी बदलत थार गाडीनं बावधनच्या 'मुहूर्त ल़ॉन्स'मध्ये लपले

18 मे 2025

पुण्यात 'पवना डॅम' इथं बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम

19 मे 2025

साताऱ्यातील पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर हगवणे बाप-बेटे लपले

19 मे आणि 20 मे 2025

पसरणी मार्गे येऊन कोगनोळी येथील 'हॉटेल हेरीटेज'मध्ये लपले

21 मे 2025

कोगनोळी येथे मित्र प्रीतम पाटील याच्या शेतावर लपले

22 मे 2025

तळेगाव-दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमधील सीसीटिव्हीत हगवणे दिसला

23 मे 2025

स्वारगेटमधून हगवणे बाप-लेकाला अटक

Vaishnavi Hagawane
Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या तपासावरच अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. हगवणेच्या पाठिंशी कोणती राजकीय ताकद होती? की तीन जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला हगवणेचा सुगावाही लागला नाही. कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यात वेगवेगळ्या गाड्या बदलत वेगवेगळ्या ठिकाणी हगवणे लपत होता. त्यावेळी तिथली पोलिस यंत्रणा काय करत होती? आतातरी वैष्णवीला न्याय मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com