Mumbai School Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Mumbai School: मुंबईसाठी पुढचे १२ तास महत्वाचे असणार आहे. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा उद्या बंद राहणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.

  • पुढचे १२ तास अतिमुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

  • उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय बीएमसी संध्याकाळपर्यंत घेणार आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मुसळधार पावसामुळे आज मुंबईतील शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. अशातच मुंबईसाठी पुढचे १२ तास महत्वाचे असणार आहे. कारण हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट दिला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबईतील शाळा बंद राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय माहिती दिली ते जाणून घ्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचा आढावा घेतला. त्यांनी आज राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देत संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'मुंबईमध्ये आज सकाळी ६ वाजेपूर्वीच्या ४८ तासांत जवळपास २०० एमएम पाऊस पडला. आज सकाळी सहापासून ते पुढच्या आठ तासांत तब्बल १७० एमएम पाऊस पडला आहे. म्हणजे मुंबईत प्रचंड पाऊस झाला. चेंबूर भागात सर्वाधिक म्हणजेच १७७ एमएम पाऊस पडलेला आहे. यावेळी पावसाचा विशेष जोर हा शहरीभागात आणि पूर्वी उपनगरात दिसतो आहे.'

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'मुंबईत एकूण १४ ठिकाणी पाणी तुंबलेले होते. यापैकी २ ठिकाणचे ट्रॅफिक पूर्णपणे थांबवण्यात आले होते. बाकीच्या ठिकाणचे ट्रॅफिक व्यवस्थित सुरू आहे. संपूर्ण मुंबईत ट्रॅफिक स्लो झालेले आहे. पण ट्रॅफिक पूर्णपणे थांबले नाही. ट्रेन्स पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. पावसाच्या जोरामुळे ट्रेनचा स्पीड स्लो झाला आहे.'

तसंच, 'मुंबईत पुढचे १० ते १२ तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात शाळांना सुट्टी दिली आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी ४ वाजल्यानंतर निघून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या भरती येण्याची शक्यता आहे. चार मीटरपर्यंत लाटा येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. उद्या मोठ्याप्रमाणात पाऊस असेल. समुद्राची आणि नाल्याची पातळी सारखी असेल. पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आज संध्याकाळी हवामानाचा अंदाज आल्यानंतर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही? हे बीएमसीकडून सांगितले जाईल.', असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

Lionel Messi : कोलकात्यात राडा! बाटल्या फेकल्या, पोस्टर फाडले; मेस्सीने फक्त १० मिनिटात मैदान सोडले, पाहा व्हिडिओ

Kitchen Hacks : कॉफी पावडर गोठून घट्ट झाल्यास काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: आयटी पार्क हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी

Shocking : बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा अन्..., मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT