ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

Political tensions in Mahayuti alliance : छगन भुजबळ यांनी गोंदियात ध्वजारोहणास नकार दिला. त्यांना नाशिकचा मान मिळाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली व गोंदियाला जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी दुसऱ्या नेत्यावर सोपवली.
Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoisting
Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoistingSaam TV News Marathi
Published On
Summary
  • छगन भुजबळ यांनी गोंदियात ध्वजारोहणास नकार दिला.

  • नाशिक पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोंदियाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांना दिली.

  • या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला.

Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoisting : महायुतीमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलह आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री हवेय, तर भाजपकडून गिरीश महाजन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे या पालकमंत्रिपदासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षाने दावा ठोकलाय. नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाला ध्वाजारोहणाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला, त्यानंतर भुसे आणि भुजबळ यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. छगन भुजबळ यांना गोंदियामध्ये ध्वदारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. पण भुजबळांनी गोंदियामध्ये ध्वाजारोहण करण्यास नकार दिला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoisting
पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; भाजपने पाडले खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्येही खदखद, बुजबळांचा नकार

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तणाव सुरू असतानाच आता ध्वाजारोहणाच्या मान कुणाल यावरूनही तेढ निर्माण झाला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना हट्ट करून बसली असतानाच आता यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. छगन बुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्रिपद हवेय, यंदाच्या ध्वजारोहणाचा नाशिकमधील मान मिळाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. भुजबळ यांनी गोंदियाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही, अशी राजकीय चर्चा सुरू झाली.

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्याने शिवसेना, भाजपसोबत राष्ट्रवादीही नाशिक पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे. पण यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. तर गोंदिया जिल्ह्यातील झेंडावंदनासाठी छगन भुजबळ यांचं नाव होत. मात्र नाशिकसोडून गोंदियाला झेंडावंदनासाठी भुजबळांनी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आलेय.

Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoisting
बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय -

नाशिकसाठी छगन भुजबळ यांनी गोंदियाला न जाण्याचा निर्णय घेतला. छगन भुजबळ यांनी आपण गोंदियाला झेंडावंदन करण्यासाठी जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेतला आला. देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाची जबाबदारी भाजपच्या दिग्गजावर सोपवली आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला आता गोंदियामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार आहेत.

Chhagan Bhujbal refusal for Gondia Independence Day flag hoisting
बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com