Hyperloop Test Track  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune: मुंबई - पुण्याचा प्रवास होणार सुसाट, अवघ्या २५ मिनीटात गाठाल पुणे; बुलेट ट्रेनलाही टाकेल मागे

Mumbai Pune travel time: भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे अवघ्या २५ मिनीटात आपल्या मुंबईहून पुणे गाठता येणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळेची बचत होईल.

Bhagyashree Kamble

मुंबई- पुणे नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. काही जण रेल्वे तर, काही जण रस्ते मार्गाने प्रवास करतात. मुंबईहून पुण्याला पोहोचण्यासाठी साधारण ३-४ तास मोडतात. पण आता हा प्रवास २५ मिनीटात पूर्ण होणार आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? हो, हायपरलूपमुळे आता मुंबई - पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. हायपरलूप बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान असणार आहे. या ट्रेनमध्ये एकाचवेळी २४ ते २८ जण प्रवास करू शकतात. प्रवाशांना यातून प्रवासाचा आनंद मिळणार आहे.

मुंबई - पुणे हायपरलूप लिंक हा जगातील सर्वात लांब हायपरलूप असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायपरलूप प्रकल्पावर रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास काम करत आहेत. हा हायपरलूप प्रकल्प आशियातील सर्वात लांब हायपरलूप ट्युब असणार आहे. ज्याची लांबी ४१० मीटर असेल'.

१५ मार्चला रेल्वे, माहिती आणि प्रसारण व माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी आयआयटी मद्रास येथे हायपरलूप प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यांनी सांगितले की, हायपरलूप प्रकल्पासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक तंत्रज्ञान चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये विकसित केले जाईल. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर आयआयटी मद्रास कॅम्पसला दिलेल्या भेटीचा व्हिडिओही शेअर केला आहे.

बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप सुपरफास्ट आहे. यामध्ये विजेचा खर्चही खूप कमी आहे. ट्यूब व्हॅक्यूममध्ये हायपरलूप धावते. ट्यूबमध्ये घर्षण नसल्यामुळे हायपरलूपचा वेग ताशी ११०० ते १२०० किमी इतका असेल. भारतीय रेल्वेने विकसीत केलेल्या हायपरलूपचा कमाल वेग ६०० किमी असणार आहे. रिपोर्टनुसार, हायपरलूप गाड्यांची सुरूवातीची धावण्याची गती ३६० किमी/ तास असण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

SCROLL FOR NEXT