भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

bihar news : भाजप प्रणित NDAला मोठा हादरा बसला आहे. घटक पक्षातील प्रमुख नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
bihar news update
bihar news Saam tv
Published On

बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारमध्ये सत्ता स्थापन होताच सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे बिहार प्रणित एनडीएला मोठा धक्का बसला आहे.

एनडीएमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षातील प्रमुख नेत्यांनी अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाल आहे. पक्षातील प्रमुख नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्र नाथ यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

जितेंद्र नाथ यांच्यासह अनेक प्रभारी प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये मदन चौधरी , प्रमोद यादव आणि राजेश रंजन यांच्या नावाचा समावेश आहे. पक्षाच्या हायकमांडने महत्वाचे निर्णय घेताना दुर्लक्ष केल्याने राजीनामा दिल्याचे नेत्यांनी सांगितले.

कुणी दिला राजीनामा?

उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्र नाथ, प्रदेश प्रवक्ते, प्रदेश महासचिव राहुल कुमार यांच्या व्यतिरिक्त मदन चौधरी, प्रमोध यादव आणि राजेश रंजन यांचे नावे समोर येत आहेत. एकाच दिवस नेत्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

bihar news update
Zubeen Garg Case : जुबीन गर्गचा अपघाती मृत्यू नव्हे,तर...; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली धक्कादायक माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपेंद्र कुशवाहा यांचा मुलगा दीपक प्रकाश यांना मंत्री करण्यात आलं आहे. यावरूनच उपेंद्र कुशवाहा यांच्या घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते नाराज होते.

bihar news update
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत BJPमध्ये प्रवेश नाकारला, संतप्त दाम्पत्य थेट अजित पवार गटात गेले; राजकीय वर्तुळात खळबळ

पत्रात काय म्हटलं?

राष्ट्रीय लोक मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्र नाथ यांनी पक्षाच्या अध्यक्षांना पत्र लिहित म्हटलं की, मी पक्षात ९ वर्षांपासून काम करत आहे. तुम्ही घेतलेले निर्णय पटले नाहीत. त्यामुळे आता तुमच्यासोबत काम करणे शक्य नाही. त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com