Zubeen Garg Case : जुबीन गर्गचा अपघाती मृत्यू नव्हे,तर...; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली धक्कादायक माहिती

Zubeen Garg Case Update : जुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जुबीन गर्गच्या मृत्यूबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
Zubeen Garg Death Case Update
Zubeen Garg Death CaseSAAM TV
Published On
Summary

आसाम विधानसभेत जुबीन गर्गच्या मृत्यूवरून चर्चा

जुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणावर आसामचे मुख्यमंत्र्यांचं मोठं भाष्य

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोग कार्यरत

पुरावे आणि साक्ष गोळा करण्याची मुदत १२ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

आसाम विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुबीन गर्गच्या मृत्यूवरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यानंतर विधीमंडळाच्या सभापतींनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्याची अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या झाल्याचं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री हिमंत यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

Zubeen Garg Death Case Update
Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटलं की, जुबीन गर्गचा मृत्यू ही सामान्य दुर्घटना नव्हे. ही दुर्घटना कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे झालेली दुर्घटना नाही. तर कोणी हत्येचा कट रचला नव्हता. ही हत्याच आहे. मुख्यमंत्री हिमंत यांनी सोशल मीडियावरही त्यांचं वक्तव्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलं आहे.

Zubeen Garg Death Case Update
जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार?

मीडिया माहितीनुसार, ५२ वर्षीय जुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबर रोजी समुद्रात पोहताना मृत्यू झाला होता. गर्गचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

जुबीन याच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी आसाम सरकारने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. या आयोगाचे नेतृत्व गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती सौमित्र करत आहेत. आयोग ३ नोव्हेंबरपासून लोकांचे जबाब आणि कागदपत्रे गोळा करत आहेत.

पहिल्या आयोगाला त्यांचा अहवाल हा २१ नोव्हेंबर रोजी सादर करायचा होता. मात्र, पुरावे सादर करणे आणि साक्ष नोंदवण्यासाठी अंतिम मुदत १२ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयोगाच्या अहवालानंतर जुबीन गर्गच्या मृत्यूचं खरं कारण येण्याची मोठी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com