जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार?

supreme court : निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलाडल्यानं आता जिल्हा परिषदेसह महापालिका निवडणुकीचं भवितव्यही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे... त्यामुळे सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देत ? कोणत्या जिल्ह्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Election 2025
Election x
Published On

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि इच्छुकांनी प्रचाराचा नारळ फोडला... त्यातच आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर जिल्हा परिषद निवडणुकीचं भवितव्य निश्चित होणार आहे...स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. ते पाहूया...

50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण

नंदुरबार 100%

पालघर 93%

गडचिरोली 78%

नाशिक 71%

धुळे 73%

अमरावती 66%

चंद्रपूर 63%

यवतमाळ 59%

अकोला 58%

नागपूर 57%

ठाणे 57%

गोंदिया 57%

वाशिम 56%,

नांदेड 56%

हिंगोली 54%

वर्धा 54%

जळगाव 54%

भंडारा 52%

लातूर 52%

बुलढाणा 52%

Election 2025
Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

दुसरीकडे 15 जिल्ह्यात सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष ढाब्यावर बसवण्यात आलाय...त्यामुळे निवडणुकीच्या आरक्षणाची सद्यस्थिती काय आहे? आणि 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा राज्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो पाहूयात.

17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 57 नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलयं...सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्य सरकारच्या विरोधात सर्वच निवडणुका रद्द होण्याची भीती आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लांबणीवर पडू शकतात.

Election 2025
Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

गेल्या महिन्यात तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणानं 50 टक्क्याची मर्यादा ओलांडली होती...त्यामुळे उच्च न्यायालयानं ताशेरे ओढताच तेलंगणा निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित केल्या होत्या... आता महाराष्ट्रासाठी सुप्रीम कोर्ट नेमकं काय आदेश देत ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आठ वर्षांपासून लांबलेल्या निवडणुका आणखी लांबणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com