Shocking News: प्रेयसीचा विरह सहन झाला नाही; इन्स्टाग्रामवर VIDEO करत विष प्यायला, जागेवरच सोडले प्राण

Lover killed himself due to breakup: प्रेयसीच्या विरहात प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ करत त्याने आयुष्य संपवलं.
Buldhana
BuldhanaSaam
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

प्रेयसीच्या विरहात प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करत असताना त्याने व्हिडिओ शुट केला. हा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला. आधी तरूण दारू प्यायला, नंतर विष प्राशन केले. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील २५ वर्षीय तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. समाधान लक्ष्मण आटोळे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचे साक्षी समाधान आटोळेसोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर सिंदखेडराजा येथील उषा नारायण गावडे हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले.

Buldhana
Nagpur Clash: नागपूर हिंसाचाराआधी नेमकं काय घडलं? जमावाची माथी कशी भडकली, धक्कादायक VIDEO समोर

उषासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर समाधान पत्नी आणि प्रेमिकासोबत वेगळा राहत होता. परिवारासोबत न राहता तो पत्नी आणि प्रेयसीसोबत दुसऱ्या घरात राहत होता. दरम्यान १३ मार्चला सायंकाळी समाधानाची प्रेमिका उषा कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. अचानक उषा निघून गेल्यामुळे समाधान सतत दारू पिऊ लागला. बरेच दिवस तो अस्वस्थ होता.

Buldhana
Shivsena:'हायकोर्टात जाऊनही हाती काही येणार नाही', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

१९ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता समाधान केशवशिवणी दुसरबीड रस्त्यावर गेला. शिवारात जाऊन तो खूप वेळ एकटाच बसला. इन्साटाग्रामवर व्हिडिओ करत समाधान आधी दारू प्यायला. नंतर रडत विष प्राशन करून त्याने स्वत:चे आयुष्य संपवले. तेथील ग्रामस्थांनी समाधानला पाहिले. त्यांनी तातडीने रूग्णावाहिकेला बोलावून घेतले.

रूग्णवाहीकेद्वारे त्याला तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरूणाच्या वडिलांना याबद्दलची माहिती देण्यात आली. वडिलांनी प्रेयसीचा विरह सहन न झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी किनगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com