Shreya Maskar
दुधी भोपळ्याची भाजी, पराठा, हलवा असे पदार्थ आपण अनेक वेळा खाल्ले आहेत. या वेळी काहीतरी नवीन स्वीट डिश ट्राय करा.
हिवाळ्यात खास जेवल्यानंतर खाण्यासाठी दुधी भोपळ्याचा खीर बनवा. हा पदार्थ बनवायला अगदी सिंपल आहे.
दुधी भोपळ्याचा खीर बनवण्यासाठी दुधी भोपळा, तूप, दूध, साबुदाणा, मलई, मावा, काजू, साखर, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून साल सोलून बिया काढून किसून घ्या.
पॅनमध्ये तूप घालून दुधीचा कीस चांगला परतून घ्या. यात दूध, साबुदाणा घालून मिश्रण शिजवून घ्या.
त्यानंतर मिश्रणात क्रीम, मावा आणि काजूचे काप घाला. त्यानंतर मिश्रणात आवडीनुसार साखर घाला.
५-१० मिनिटे दुधी भोपळ्याचा हलवा शिजवून घ्या. साखर विरघळल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पावडर घाला.
दुधी भोपळ्याचा खीर थंड करून अधिक टेस्टी लागते. त्यामुळे खीर थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.