Shreya Maskar
मटार उसळ बनवण्यासाठी मटार, खोबरं, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, धणे- जिरे पावडर, तेल, खडे मसाले इत्यादी साहित्य लागते.
मटार उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मटार सोलून त्यातील दाणे कुकरमध्ये मीठ, पाणी टाकून शिजवून घ्या. १-२ शिट्ट्यांमध्ये मटार चांगले शिजतील.
त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून खडे मसाले चांगले परतून घ्या. यात तुम्ही सर्व प्रकारच्या मसाल्यांचा वापर करू शकता.
मिक्सरच्या भांड्यात आल, लसूण, टोमॅटो आणि कांदा टाकून पेस्ट बनवा. तयार वाटण फोडणीत टाका.
यात तुम्ही आवडीनुसार बटाटे टाकून एक उकळी काढून घ्या. बटाट्यामुळे भाजीला चव येते आणि त्याचे प्रमाण वाढते.
भाजीला एक उकळी आल्यावर त्यात उकडलेले मटार टाकून मिक्स करा.
एक उकळी आल्यावर यात सर्व मसाले, मीठ घालून मिश्रण ५-८ मिनिटे शिजवा. त्यानंतर यावर लिंबू पिळा. कोथिंबीर आणि फरसाण टाका.
गरमा गरम मटार उसळचा बटर लावलेल्या पावांसोबत आस्वाद घ्या. हा पदार्थ बनवायला सिंपल आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी आहे.