Shreya Maskar
हिवाळ्यात बाजारात हिरवेगार पेरु येतात. तेव्हा जेवणासाठी खास चटपटीत पेरुच्या चटणी बनवा.
पेरुच्या चटणी बनवण्यासाठी पेरू, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, धणे पावडर-, जिरे पावडर, काळी मिरी पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
पेरुच्या चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पेरू स्वच्छ धुवून पुसून घ्या. चटणी बनवण्यासाठी कच्चे पेरूचा वापर करा.
पेरुचे ४ भाग करून बियांचा भाग काढून टाका. त्यानंतर पेरूचे तुकडे करा.
पेरुचे काप, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे आणि लिंबाचा रस टाकून मिक्सरच्या भांड्यात पेस्ट बनवा.
यात धणे पावडर, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
पेरुचे मिश्रण बारीक केल्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून मस्त पेस्ट बनवा. मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
इडली, डोसा, चपाती, भाकरीसोबत पेरुच्या चटणीचा आस्वाद घेऊ शकता.