Shreya Maskar
तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ, गूळ, शेंगदाणे, ड्रायफूट आणि तूप इत्यादी साहित्य लागते. हिवाळ्यात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात शेंगदाणे घालून भाजून घ्या.
भाजलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून साल सोलून घ्या. मिक्सरला शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करा.
पॅनमध्ये तूप टाकून पांढरे तीळ भाजून घ्या. तीळाचा रंग बदल्यानंतर ताटात पसरवून ठेवा.
आता पॅनमध्ये तूप, शेंगदाण्याचा कूट आणि तीळ घालून सर्व छान एकजीव करून घ्या. यात तुम्ही ड्रायफूट्सचे काप देखील टाकू शकता.
त्यानंतर मिश्रणात गूळ छान विरघळवून घ्या. सर्व मिश्रण नीट मिक्स होईल याची काळजी घ्या.
आता हाताला तूप लावून तिळाचे लाडू वळून घ्या. हवाबंद डब्यात लाडू भरा. महिनाभर तिळाचे लाडू टिकतील.
अवघ्या १०- १५ मिनिटांत टेस्टी तिळाचे लाडू तयार झाले आहेत. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने आरोग्याला जास्त फायदे मिळतात.