Shreya Maskar
आलू चाप बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, बेसन, कॉर्नफ्लॉवर, आलं-लसूण पेस्ट, कांदा, बेकिंग सोडा, हिरवी मिरची, लाल तिखट, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
आलू चाप बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकडवून घ्या. तुम्ही यात मीठ देखील टाकू शकता.
बटाटे सोलून बाऊलमध्ये मॅश करा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गोल्डन फ्राय करा.
यात आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून मिश्रण भाजून घ्या.
मिश्रणात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मॅश केलेले बटाटे टाकून शिजवून घ्या. जेणेकरून टिक्की मस्त कुरकुरीत होईल.
दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन, कॉर्नफ्लॉवर , पाणी आणि बेकिंग पावडर घालून पेस्ट बनवा. पेस्ट जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
आता बटाट्याच्या मिश्रणाची टिक्की बनवा आणि बेसनाच्या पीठात घोळवून घ्या. बटाट्याच्या टिक्कीला मिश्रण सर्व बाजूंनी लागेल याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून आलू चाप तळून घ्या. बटाटा गोल्डन फ्राय झाले की खायला तयार आहेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर आलू चापचा आस्वाद घ्या.