Shreya Maskar
पाटवडी रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी द्या. गॅस मंद आचेवर ठेवा.
या मिश्रणात कोथिंबीर, आलं- लसूण पेस्ट, पाणी, हळद, लाल तिखट घालून एक उकळी काढा.
त्यानंतर मिश्रणात बेसन घालून शिजवून घ्या. मिश्रण जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही, याची काळजी घ्या.
दुसरीकडे एका ताटाला तूप लावून त्यात बेसन पसरून घ्या. त्यानंतर वरून कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं भुरभरवा. आता वड्या पाडून घ्या.
रस्सा तयार बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, खोबरं, खसखस, तीळ चांगले परतून घ्या.
यात कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, तिखट, मीठ, धनेपूड आणि पाणी घालून एक चांगली उकळी येऊ द्या.
शेवटी झणझणीत रस्सामध्ये बेसन वडी घालून एक उकळी काढा. अशाप्रकारे पाटवडी रस्सा तयार झाला आहे.
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा गरमागरम भातासोबत खा. तसेच भाकरी आणि चपातीसोबतही रेसिपी चांगली लागते.