Shreya Maskar
मंचुरीयन भेळ बनवण्यासाठी कुरकुरीत मंचुरियन बॉल्स, कोबीची भाजी आणि शेजवान चटणी इत्यादी साहित्य लागते.
मंचुरीयन भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेला कोबी, गाजर आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
त्यानंतर यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालून मिश्रण एकजीव करा. जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
तयार मिश्रणाचे छोटे बोल्स करून तेलात गोल्डन फ्राय करून घ्या. अशाप्रकारे मंचुरीयन तयार झाले आहेत.
मोठ्या बाऊलमध्ये चायनिज शेव, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर एकत्र करा.
यात तळलेल्या मंचुरीयन बॉल्सचे तुकडे, लांब चिरलेला कोबी घालून सर्व एकजीव करा. मंचुरीयन कुरकुरीत असताना भेळचा आस्वाद घ्या.
शेवटी यात झणझणीत शेजवान चटणी टाकून मिक्स करा. अशाप्रकारे फक्त ५-१० मिनिटांत चटपटीत मंचुरीयन भेळ तयार झाली.