Shreya Maskar
गावाकडे बनवतात तसे भाजणीचे वडे घरी सिंपल पद्धतीने बनवा. ही रेसिपी जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी उत्तम आहे.
भाजणीचे वडे बनवण्यासाठी थालीपीठाची भाजणी, लाल तिखट, हळद, ओवा, पांढरे तीळ, तेल, कोथिंबीर, हिरव्या मिरची पेस्ट, मीठ इत्यादी साहित्य लागते.
भाजणीचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गरम तेल, थालीपीठाची भाजणी, लाल तिखट मसाला आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्या.
आता या मिश्रणात हळद, ओवा, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पीठ मळून घ्या.
कणिक मळून झाल्यावर १५-२० मिनिटे पीठ बाजूला ठेवून द्या. यामुळे पीठ चांगले मुरते आणि वडे देखील खुसखुशीत होतात.
पीठ मळल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून वडे थापून घ्या. वडे थापण्यासाठी तुम्ही प्लास्टिक पेपर थोडे तेल लावून घ्या.
वडा थापताना मधोमध एक छिद्र करून घ्या. त्यानंतर तेल गरम करून त्यात भाजणीचे वडे खमंग तळून घ्या.
भाजणीचे वडे गरमागरम रस्सा भाजी, सांबार किंवा चटणीसोबत आस्वाद घ्या. पाहुणे आल्यावर ही रेसिपी अवघ्या मिनिटांत बनवता येईल.