WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

India Vs South Africa Test : दक्षिण आफ्रिका संघाकडून कसोटी मालिकेत २-० ने पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाची थेट पाचव्या स्थानी घसरण झालीय.
Team India Slip in WTC points table
Team India Slip in WTC points tablesaam tv
Published On
Summary
  • दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा २-० ने पराभव

  • मायदेशातच भारताने कसोटी मालिका गमावली

  • पराभवानं भारतीय संघाला मोठा झटका

  • WTC पॉइंट्स टेबलमध्ये घसरण, पाकिस्तानही पुढे गेला

World Test Championship : भारताच्या कसोटी क्रिकेट संघावर कधी नव्हे ती नामुष्की ओढवली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाकडून मायदेशातच कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला. या पराभवामुळं भारतीय क्रिकेट संघाला मोठा फटका बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघाची घसरण झाली आहे. भारतीय संघाची आता पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तुलनेने दुबळा समजला जाणारा पाकिस्तान संघही यादीत वरच्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्ताननेही मागे टाकले आहे. भारत पाचव्या स्थानी आहे. तर पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तब्बल ४०८ धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेनं २५ वर्षांनंतर भारताला कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा कारनामा करून दाखवला.

या पराभवानंतर भारताला मोठा हादरा बसला आहे. WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारत पाचव्या स्थानी घसरला आहे. भारतानं आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय, तर चार सामन्यांत पराभव झाला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघ आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका, पाकिस्तान, भारत हे संघ आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-० ने गमावल्यानंतर या शर्यतीत असलेल्या अव्वल दोन संघ आणि भारत यांच्यातील अंतर आणखी वाढले आहे.

लागोपाठ दुसऱ्या वर्षी भारताला मायदेशात पाहुण्या संघांकडून पराभूत व्हावे लागले आहे. गेल्या वर्षी भारताला न्यूझीलंडने ०-३ ने पराभूत केलं होतं. त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या. भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांना टीकेचा सामना करावा लागला होता. तर कसोटी संघात बदल करण्याची मागणी झाली.

Team India Slip in WTC points table
T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, ४ ग्रुपमध्ये कोणकोणते संघ असणार?

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम मॅनेजमेंटनुसार संघात बदल करण्यात आले. आर अश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंनी संन्यास घेतला. त्यानंतर संघाचं नेतृत्व युवा खेळाडू शुभमन गिलच्या हाती देण्यात आलं. इंग्लंडमधील शांत आणि संयमी कामगिरीमुळं या युवा संघाचं कौतुकही झालं. पण मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनुभवाची उणीव भासली. दक्षिण आफ्रिकेच्या क्वालिटी गोलंदाजांसमोर भारताचे युवा शिलेदार ढेर झाले. त्यामुळं आता गौतम गंभीरसह या खेळाडूंवर टीका होत आहे.

Team India Slip in WTC points table
Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com