T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

T20 World Cup 2026 Schedule LIVE Updates : आयसीसी टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं असून, हायव्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्या दिवशी होणार आहे, याची तारीखही जाहीर झाली आहे. भारतीय संघ असलेल्या गटात इतर कोणते संघ आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात....
T 20 World Cup 2026 Schedule Update team India Favourite
T 20 World Cup 2026 Schedule Update team India FavouriteSocial media
Published On

ICC Men’s T20 World Cup 2026 Fixtures Announced : पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ च्या वेळापत्रकाची घोषणा केली. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांकडे आहे. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा ८ मार्च २०२६ पर्यंत असेल. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होईल. हा हायव्होल्टेज सामना कोलंबोत रंगणार आहे.

टी २० वर्ल्डकपचं (T20 World Cup 2026) आतापर्यंत नऊ वेळा आयोजन करण्यात आलं आहे. पहिलं पर्व २००७ मध्ये झालं होतं. भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले होते. तर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसरं विजेतेपद पटकावलं होतं. आतापर्यंत कोणत्याही संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद राखता आलेले नाही. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे :

भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, इंग्लंड, यूएई, नामिबिया, नेपाळ, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे, इटली, पाकिस्तान, आयर्लंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएसए, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे २० संघ वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

टी २० वर्ल्डकप २०२६ या स्पर्धेतील सर्व सामने एकूण आठ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यात भारतातील पाच आणि श्रीलंकेतील तीन ठिकाणांचा समावेश आहे. रोहित शर्माला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मा हा या वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहे, अशी घोषणा जय शहा यांनी केली.

भारतात मुंबईतील वानखेडे, दिल्लीत अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम आणि कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सामने होतील. तर श्रीलंकेत कोलंबोतील प्रेमदासा आणि सिंहली स्पोर्ट्स क्लब आणि कँडीच्या पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत.

T 20 World Cup 2026 Schedule Update team India Favourite
Ind vs SA Test : भारतावर पराभवाचं सावट; 'शेर' का होताहेत ढेर? 'गंभीर' कारणं

ग्रुप ए - भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड्स, नामिबिया

ग्रुप बी - ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान

ग्रुप सी - इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश, नेपाळ, इटली

ग्रुप डी - न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com