MUMBAI  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking : मुंबईच्या पवईत धक्कादायक प्रकार; माथफिरूने २०-२५ लहान मुलांना रुममध्ये ओलिस ठेवलं

Mumbai Shocking News : मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवईतील माथफिरूने २०-२५ लहान मुलांना रुममध्ये ओलिस ठेवल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

पवईत घडला धक्कादायक प्रकार

पवईतील आर ए स्टुडिओमध्ये घडला धक्कादायक प्रकार

पोलिसांनी केली लहान मुलांची सुटका

मुंबईच्या पवईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईत दिवसाढवळ्या लहान मुलांना एका रुममध्ये ओलिस ठेवल्याची घटना उघडकीस आली. पवईतील आर ए स्टुडिओमध्ये प्रकार घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच 10 चे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या मुलांची सुटका केली.

पवईच्या आर ए स्टुडिओमधील पहिल्या मजल्यावर अॅक्टिंग क्लास चालतो. या क्लासमध्ये सकाळी ऑडिशनसाठी १०० मुले आले होते. यादरम्यान स्टुडिओमध्ये काम करणारा आणि युट्यूब चॅनल रोहित आर्य याने १५ ते २० मुलांना ओलिस ठेवलं होतं. पोलिसांनी शर्थीने सर्व अल्पवयीन मुलांची सुखरुप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गेल्या चार ते ५ दिवसांपासून ऑडिशन करत होता. आज ऑडिशनसाठी ८० मुले आली होती. मात्र, काही मुलांना बंद खोलीत ओलिस ठेवलं. त्यानंतर लहान मुले खिडकीतून डोकावत होते. या घटनेनंतर स्टुडिओबाहेर लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली.

पोलिस मोठ्या फौजफाट्यासह स्टुडिओला घेरलं. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केलं. पोलीस आरोपीची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस आरोपीच्या मागण्या जाणून घेत होते. तर दुसरीकडे पोलीस लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

पवई ओलीस नाट्यप्रकरणी आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुलांच्या मनावर घटनेचा परिणाम होऊ नये म्हणून कौन्सिलर बोलवण्यात आला. रोहित आर्य याने मुलांना ओलीस का ठेवले याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT