सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला आहे.
Satara Doctor death case
Satara Doctor Case Saam tv
Published On
Summary

आरोपी पीएसआय गोपाळ बदने याचा मोबाईल पोलिसांकडून जप्त

बदनेच्या नातेवाईकांकडून मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्यात जमा

मोबाईल सापडल्यामुळे तपासाला वेग मिळणार

साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना बदनेचा मोबाईल सापडल्यानंतर तपासाचा वेग आणखी वाढणार आहे.

Satara Doctor death case
Kalyan : 'एकच प्याला' पडला महागात; दारुच्या दुकानातील एक्सपायरी डेट संपलेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती बिघडली

साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपळ बदने या दोघांची चौकशी सुरु आहे. डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर पीएसआय गोपाळ बदने फरार झाला होता. घटनेनंतर त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलं होतं.

Satara Doctor death case
IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

अखेर बदनेचा मोबाईल सापडला

मृत्यू प्रकरणानंतर काही दिवसांनी आरोपी बदने स्वत: फलटण पोलीस स्टेशनला हजर झाला होता. पोलिसांत हजर झालेल्या बदने याने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केला नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध पोलिसांकडू सुरु होता. त्यानंतर आज पीएसआय गोपाळ बदने याचा मोबाईल पोलिसांना सापडला आहे.

तपासाचा वेग वाढणार

पीएसआय बदने याच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केला. बदनेच्या मोबाईलमुळे डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात तपासाला गती येणार असल्याचे बोललं जात आहे.

Satara Doctor death case
Kalyan : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु; काँग्रेसच्या २ शिलेदारांचा शिवसेना प्रवेश

बीडमध्ये शोले स्टाईल आंदोलन

साताऱ्याच्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे. याप्रकरणी ताबडतोब एसआयटी स्थापन करण्यात यावी. पत्रकार परिषद घेऊन महिला असून महिलेविरोधात बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे, या मागणीसाठी बीडमधील आंदोलकांनी बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com