Mumbai Police News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: शिर्डीला जायची इच्छा अपूर्णच राहिली, पायी यात्रेदरम्यान मुंबईच्या पोलिसाचा मृत्यू

Shirdi Payi Yatra: अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Priya More

संजय गडदे, मुंबई

शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्यासंख्येने भाविक जात असतात. राज्यभरातून पायी पालखी काढून साईबाबाच्या दर्शनासाठी भाविक जातात. मुंबई येथून साईबाबाच्या दर्शनासाठी पालखी निघाली होती. या पालखीमध्ये सहभागी झालेल्या पोलिसाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रफुल सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे. शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे १० किलोमीटर अंतर बाकी असतानाच सुर्वेचे हृदयविकाराने निधन झाले. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. प्रफुल्ल सुर्वे हे ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस दलातून निवृत्त होणार होते.

प्रफुल्ल सुर्वे हे पोलिस दलात १९९३ मध्ये नोकरीला सुरुवात केली. सुरुवात पोलिस दलात पोलिस दलात एल ए 2 वरळी विभागात नोकरीला सुरुवात केल्यानंतर राज्य गुप्त वार्ता, वर्सोवा पोलीस ठाणे इथे सेवा केल्यानंतर आता सध्या अंधेरी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते. दरवर्षी ते अंधेरी ते शिर्डी असा पायी प्रवास साई पालखीसोबत करत असत. याही वर्षी ते प्रभादेवी ते शिर्डी असा साई सोहळ्यासाठी निघाले असता आज सकाळी शिर्डी अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

प्रकाश सुर्वे त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच पोलिस दलावर देखील शोककळा पसरली आहे प्रफुल सुर्वे यांच्या पाठीमागे पत्नी, आणि एक मुलगा असा परिवार आहे. शिर्डी येथील रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून मृतदेह डी एन नगर येथील त्यांच्या राहत्या घरी आणला जाणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली. आज सायंकाळी मुंबईच्या वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईमधील एका पोलिसाचा राहत्या घरी मृत्यू झाला होता. मालवणी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांचे २ डिसेंबरला निधन झाले होते. राहत्या घरी छातीमध्ये कळ आल्याने ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयामध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT