Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास

Central Line Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर १० जानेवारी २०२५ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे शुक्रवार आणि रविवारी मध्य रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे.
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai Local Mega BlockSaam TV
Published On

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १० जानेवारी २०२५ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे शुक्रवार आणि रविवारी मध्य रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन दिवशी कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणासंदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम पूर्ण करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुसरा ब्लॉक हा १० जानेवारी २०२५ म्हणजेच शुक्रवारी घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधी सकाळी ११.२० वाजल्यापासून ते दुपारी १.०५ वाजेपर्यंत म्हणजे १ तास ४५ मिनिटांचा असेल. हा ब्लॉक भिवपुरी रोड आणि पळसधारी स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून) असणार आहे. या ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकलसेवा रद्द राहतील.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai News: शाळेत गेली पण परत आलीच नाही, विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये केली आत्महत्या; मुंबईतील घटनेने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते ११.१४ दरम्यान कर्जतसाठी सुटणाऱ्या लोकल नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. तर कर्जत येथून सकाळी ११:१९ ते दुपारी १:०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या लोकल नेरळ येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येतील. या कालावधीमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे. 11014 कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि कल्याण येथे उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल येथे थांबेल.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai Crime: मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

तिसरा ब्लॉक १२ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे रविवार असणार आहे. हा ब्लॉक दुपारी १.५० वाजल्यापासून ते ३.३५ वाजेपर्यंत म्हणजे १ तास ४५ मिनिटांचा असणार आहे. हा ब्लॉक पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून) याठिकाणी असणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये बदलापूर आणि खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai News: शिर्डीला जायची इच्छा अपूर्णच राहिली, पायी यात्रेदरम्यान मुंबईच्या पोलिसाचा मृत्यू

या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - खोपोली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत उपनगरी लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.४० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत उपनगरी लोकल बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai News : घराचं स्वप्न दाखवलं, झोपडीधारकांसह एसआरएला फसवलं; बोरीवलीत नेमकं काय घडलं?

कर्जत येथून १३.५५ वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आणि खोपोली येथून १३.४८ वाजता सुटणारी खोपोली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून सुटेल. तसेच, कर्जत येथून १५.२६ वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून सुटेल. या ब्लॉकचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील होणार आहे. ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर - दौंड एक्सप्रेस दुपारी २:५० ते ३:३५ पर्यंत चौक येथे रेग्युलेट करण्यात येईल.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा मेगाब्लॉक, बदलापूर-खोपोली लोकलसेवा बंद, वेळापत्रक पाहून करा प्रवास
Mumbai News : घराचं स्वप्न दाखवलं, झोपडीधारकांसह एसआरएला फसवलं; बोरीवलीत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com