Mumbai News : घराचं स्वप्न दाखवलं, झोपडीधारकांसह एसआरएला फसवलं; बोरीवलीत नेमकं काय घडलं?

Borivali : बोरीवली पश्चिममध्ये एका विकासकाने (डेव्हलपरने) वीस वर्षांपूर्वी झोपडीधारकांना घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. पण अजूनही त्या ठिकाणी अनेकांना हक्काचे घर मिळाले नाही.
Borivali slums
Borivali slumsSaam Tv
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

Borivali News : झोपडीधारक आणि एस. आर. ए. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची फसवणूक करणाऱ्या विकासकांविरोधात मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोपडीधारकांना घरे न देणे, त्यांना कागदपत्रे न देणे, परवाना न देता सदनिका देणे अशा तक्रारींमुळे श्रीनिवास डेव्हलपर्सचे संचालक प्रविण विरम सत्रा आणि प्रेमजी विरम सत्रा या विकासकांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.

बोरीवली पश्चिमेकडील एकसर गावात २००४ मध्ये बोरभाट सह. गृह. नि. संस्था ही झो. पु. योजना सुरु करण्यात आली. याबाबत श्रीनिवास डेव्हलपर्सने करार करुन एस. आर. ए. कडे योजना दाखल केली. या योजनेमध्ये झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी एकूण ६ इमारती, विक्री घटकासाठी १ इमारत आणि कॉलेजसाठी १ इमारत असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान २९ सप्टेंबर २०११ रोजी पुनर्वसन इमारत क्र. १ व १ ला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर इमारतीमध्ये २६७ पात्र झोपडीधारकांना सदनिका वाटप करण्यात आले.

वीस वर्ष उलटूनही विकासकाने उर्वरित २१३ पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन केले नाही. त्याशिवाय त्यांनी इमारत क्र. ५ बांधून झोपडीधारकांना विना भोगवटा प्रमाणपत्र देत सदनिकांचा ताबा दिला. उरलेल्या इमारतींचे बांधकामही पूर्ण केले नाही. सदनिका भोगवटा प्रमाणपत्र न देता विकासकाने सदनिका वाटप करुन झोपडीधारकांचा जीव धोक्यात घातला हे समजल्यावर प्राधिकरणाने जुलै २०१६ मध्ये विकासकांना नोटीस बजावली. मात्र विकासकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा एकदा जुलै २०१३ मध्ये पत्राद्वारे प्राधिकरणाकडून विकासकाला पुर्नसंचयित करण्यासाठी कळवले होते.

Borivali slums
Torres Company Fraud : कोट्यवधींचा हिरा दिला; ५०० रुपयांचा निघाला, टोरेसचा झोल Exclusive

योजना वेळेत पूर्ण न करता इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र न देणे, अग्निशमक दल ना हरकत प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक प्रमाणपत्रे न घेता इमारतींमध्ये लोकांना अनधिकृतपणे राहण्यासाठी सदनिका दिल्या. त्यामुळे लोकांच्या जीवाला आणि मालमत्तेस धोका निर्माण होवू शकतो. ही गोष्ट लक्षात आल्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांनी विकासकाविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Borivali slums
Mumbai News: तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com